Join us  

डॉक्टरांचा खुलासा सोनालीच्या निष्काळजीपणामुळे 'या' स्टेजला पोहोचला कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:33 PM

सोनाली बेंद्रने काही दिवसांपूर्वीच तिला हायग्रेड कॅन्सर झाल्याचा खुलासा केला आहे. सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेते आहे.

ठळक मुद्दे शरीराला होणाऱ्या वदेनांकडे तिने वेळीच लक्ष दिले नाही जेव्हा वेदना असाह्य झाल्या तोपर्यंत हा आजार चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला

सोनाली बेंद्रने काही दिवसांपूर्वीच तिला हायग्रेड कॅन्सर झाल्याचा खुलासा केला आहे. सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेते आहे. सोनालीचे फॅन्स ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतायेत. याच दरम्यान सोनालीचा मेडिकल रिपोर्टसमोर आला आहे. सोनालीच्या निष्काळजीपणामुळे ती कॅन्सर  हायग्रेड स्टेजला पोहोचला आहे.

 शरीराला होणाऱ्या वदेनांकडे तिने वेळीच लक्ष दिले नाही असे सोनालीवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोनाली दीर्घकाळापासून शारिरीक वेदना होत होत्या ज्याकडे तिने दुर्लक्ष केले. जेव्हा वेदना असाह्य झाल्या तोपर्यंत हा आजार चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला होता. ज्यावेळी तिने चाचण्या केल्या तेव्हा कॅन्सर झाले असल्याचे समोर आले. तिने योग्यवेळी तपासणी केली असती तर सुरुवातीलाच कॅन्सरचे निदान झाले असते.  सोनालीने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने मेटास्टेटिक कॅन्सरचा उल्लेख केला होता.  सोनालीने ट्विटर अकाऊंटवर केस कापतानाचा इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. सोनालीने लिहिले की, गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेले प्रेम पाहून मी भावूक झाले आहे. मी त्या लोकांची खूप आभारी आहे ज्यांनी कॅन्सरशी लढा देण्याचे त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केलेत. त्यांनी शेअर केलेल्या गोष्टींमुळे मला शक्ती आणि हिंमत मिळत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला कळाले की, मी एकटी नाहीये.मी रोज नव्या आव्हानांना तोंड देत आहे, या आव्हानांसोबत मी एक-एक करून लढा देत आहे.  #SwitchOnTheSunshine- ही माझा मला होत असलेल्या त्रासाशी लढण्याची पद्धत आहे'.  

टॅग्स :सोनाली बेंद्रे