Join us  

कधीकाळी सुपरस्टार यशचा बॉडीगार्ड होता KGF-1चा ‘गरूडा’, अशी मिळाली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 12:47 PM

‘केजीएफ1’मध्ये यशसोबत अनेक स्टार्स दिसले होते. पण सर्वाधिक चर्चा झाली होती ती गरूडाची भूमिका साकारणा-या रामचंद राजूची.

ठळक मुद्देयशचा बॉडीगार्ड ही रामचंद्रची ओळख कधीच पुसली गेली आहे आणि रामचंद्र एक अ‍ॅक्टर आहे.

साऊथचा सुपरस्टार यशचा ‘केजीएफ-चॅप्टर 1’ हा सिनेमा प्रचंड गाजला. आता या सिनेमाचा दुसरा पार्ट अर्थात ‘केजीएफ- चॅप्टर 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या दुस-या पार्टमध्ये यशसोबत बॉलिवूड स्टार संजय दत्त सुद्धा महत्त्वाच्या रोलमध्ये दिसणार आहे. ‘केजीएफ1’मध्ये यशसोबत श्रीनिधी शेट्टी, अनंत नाग, अर्चना जॉईससह अनेक स्टार्स दिसले होते. पण सर्वाधिक चर्चा झाली होती ती गरूडाची भूमिका साकारणा-या रामचंद राजूची.

रामचंद्र राजूने सोन्याच्या खाणीचा मालक सूर्यवर्धनचा मोठा मुलगा गरूडाची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या या नकारात्मक भूमिकेचे अपार कौतुक झाले होते. या भूमिकेनंतर रामचंद्र राजू प्रचंड लोकप्रिय झाला. पण त्याला ही भूमिका कशी मिळाली, याची कथा तुम्हाला माहितीये?

हो, ऐकून आश्चर्य वाटेल पण ‘केजीएफ1’ आधी रामचंद्र राजूचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता. तो यशचा बॉडीगार्ड होता. दीर्घकाळापासून यशची सावली बनून वावरत होता. एकेदिवशी ‘केजीएफ’चा दिग्दर्शक प्रशांत नीलने यशसोबत रामचंद्रला पाहिले आणि त्यांनी त्याला गरूडाच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला सांगितले. रामचंद्रसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. पण तो कामाला लागला. अभिनयाचे धडे गिरवले, शरीरावर आणखी मेहनत केली आणि यानंतर थेट कॅमेºयापुढे उभा झाला. रामचंद्रची मेहनत फळास आली. ऑडिशनमध्ये त्याने अशी काही कमाल केली की गरूडाच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. यानंतर प्रशांत नीलने त्याला साईन केले. चित्रपट रिलीज झाला आणि रामचंद्र लोकांच्या नजरेत भरला.

यशचा बॉडीगार्ड ही रामचंद्रची ओळख कधीच पुसली गेली आहे आणि रामचंद्र एक अ‍ॅक्टर आहे. त्याच्या अभिनयाचे वारेमाप कौतुक होतेय. नशीबाला कलाटणी म्हणतात, ते यालाच.

‘केजीएफ- चॅप्टर 1’ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता. ‘केजीएफ 2’ याचाच सीक्वल आहे.‘केजीएफ -1’  ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे ‘केजीएफ 2’ ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये यशशिवाय संजय दत्त आणि रवीना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.   अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

जबरदस्त!  एकदिवस आधीच रिलीज झाला ‘केजीएफ 2’ टीजर, तुम्ही पाहिलात का?

टॅग्स :केजीएफ