Join us  

​तुम्हाला माहिती आहे का शाहिद कपूर नव्हे तर बॉबी देओल होता जब वी मेट या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 6:35 AM

जब वी मेट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटातील करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ...

जब वी मेट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटातील करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या केमिस्ट्रीचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. शाहिद या चित्रपटात एक परिपक्कव अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या समोर आला. पण या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी शाहिद कपूर हा पहिली पसंती नव्हता. या चित्रपटात नायकाची भूमिका बॉबी दओल साकारणार होता.बॉबीनेच याबद्दलची माहिती नुकतीच दिली आहे. त्याने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी लोकांसमोर आणल्या आहेत. तो सांगतो, "या चित्रपटाचे नाव सुरुवातीला गीत असे होते. इम्तियाज अलीचा सोचा ना था हा चित्रपट पाहून मी प्रचंड प्रभावित झालो होतो आणि त्याच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे मी इम्तियाजला भेटलो. त्यावेळी त्याची जब वी मेटची कथा लिहून झाली होती आणि तो निर्माता शोधत होता. श्री अष्टविनायक नावाच्या एका प्रोडक्शन हाऊसला माझ्यासोबत काम करायचे होते. त्यांना मी माझ्यासोबत इम्तियाजलादेखील साइन करायला सांगितले. त्याच्याकडे पटकथाही तयार असल्याचे मी सांगितले. तसेच मी करिना कपूरचे नावदेखील त्यांना सुचवले होते. पण इम्तियाजचे चित्रपट बिग बजेट चित्रपट असतात असे त्या प्रोडक्शन हाऊसचे म्हणणे होते, तर दुसरीकडे करिना इम्तियाजला भेटायला तयारच नव्हती. मी तिच्याकडे इम्तियाजला घेऊन गेलो. आमचे बोलणे झाल्यावर ती चित्रपट करायला तयार झाली. पण तिला सहा महिन्यांचा अवधी हवा होता. सहा महिन्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल असे मला वाटत होते. पण दरम्यानच्या काळात खूप वेगळ्या गोष्टी घडल्या. काही दिवस उलटल्यानंतर मला कळले की, इम्तियाज अलीला त्या प्रोडक्शन हाऊसने साईन केले आणि हा चित्रपट करिना करत आहे, करिनाने चित्रपटाच्या नायकासाठी तिचा त्यावेळेचा प्रियकर शाहिद कपूरचे नाव सुचवले आहे. हे सगळे कानावर पडल्यानंतर मला चांगलाच धक्का बसला होता.इम्तियाजने जब वी मेट या चित्रपटानंतर हायवेच्यावेळीदेखील माझ्यासोबत तीच गोष्ट केली. मी हायवे हा चित्रपट करणार होतो. पण काही कारणास्तव ते घडू शकले नाही. आजही माझ्या मनात इम्तियाच्याबाबतीत काही वाईट नाहीये. आम्ही दोघे आजही चांगले मित्र आहोत आणि आजही त्याच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे.