Join us  

बॉबी देओलपेक्षाही जास्त श्रीमंत आहे त्याची पत्नी,संपत्तीचा आकडा जाणून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 4:09 PM

बॉबी देओल (Bobby Deol )हा एक उत्तम अभिनेता आहे ज्याने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉबी देओलबद्दल सांगायचे तर,त्याचे काही चित्रपट चांगले हिट ठरले, परंतु बॉबी देओलला त्याचे वडील धर्मेंद्र (Dharmendra) आणि भाऊ सनी देओलसारखे (Sunny Deol) यश मिळू शकले नाही.

बॉलिवूड सेलिब्रेटी नेहमीच त्यांच्या कमाईमुळे आणि त्यांच्या आलिशान लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. असेही काही अभिनेते आहेत ज्यांची पत्नीदेखील त्यांना कमाईच्या बाबतीत तगडी टक्कर देतात. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्या पत्नी भलेही जास्त चर्चेत नसतात किंवा रुपेरी पडद्यावर झळकत नसल्या तरी व्यवसायाच्या माध्यमातून गलेलठ्ठ कमाई करतात.सध्या बॉबी देओलची (Bobby Deol )पत्नी चर्चेत आली आहे.

बॉबी देओल हा एक उत्तम अभिनेता आहे ज्याने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉबी देओलबद्दल सांगायचे तर,त्याचे काही चित्रपट चांगले हिट ठरले, परंतु बॉबी देओलला त्याचे वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओलसारखे यश मिळू शकले नाही.बॉबी देओलची चर्चाही सध्या त्याच्या पत्नीमुळे होत आहे.बॉबी देओलच्या पत्नीचे नाव तान्या आहुजा आहे.बॉबी देओल आणि तान्या आहुजा यांचे लव्हमॅरेज आहे.अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 1996 मध्ये लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.

बॉबी देओलने चित्रपट अभिनेत्रीसोबत लग्न करण्यापेक्षा एका व्यापारी कुटुंबातील तान्या आहुजासोबत लग्न केले.बॉबी देओल आणि तान्या आहुजा यांना आर्यमन आणि धर्म नावाची दोन मुले आहेत. मुलांनासुद्धा प्रसिद्धीची आवड नाही. ते जास्तीत जास्त मीडिया पासून दूर राहणेच प्रयत्न करतात.  तान्या आहुजाच्या नावावर बोलायचे झाले तर तिचे वडील एक मोठे उद्योगपती आहेत ज्यांनी आपली 300 कोटींची संपत्ती तान्या आहुजाच्या नावावर केली होती. आज तान्या एक मोठी व्यावसायिक महिला आहे जी खूप श्रीमंत आहे.बॉबी देओलपेक्षा तान्या जास्त पैसे कमावते आणि कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. 

बॉबी देओलने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 2018 मध्ये, 'रेस 3' सिनेमाने पुन्हा एकदा त्याला चांगल्या ऑफर येऊ लागल्या. याआधी त्याने सिनेमे केले होते परंतु, त्या सिनेमांना फारसे यश मिळाले नाही. रूपेरी पडदा गाजवल्या नंतर 2020 मध्ये त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले.

टॅग्स :बॉबी देओलधमेंद्र