Join us  

सलमान का म्हणतोय बरे झाली की, ती गोष्ट माझ्या आयुष्यात घडली नाही

By प्राजक्ता चिटणीस | Published: March 27, 2019 6:59 PM

सलमान खानच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. त्याच्या आयुष्यात एक गोष्ट घडली नाही हे बरेच झाले असे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

ठळक मुद्देतुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक दिग्दर्शक म्हणून माझ्या करियरला सुरुवात करणार होतो. पण ती गोष्ट होऊ शकली नाही यासाठी मी आज देवाचे नक्कीच आभार मानतो.

सलमान खानने आज एक अभिनेत्यासोबतच एक निर्माता म्हणून देखील त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्याने आजवर अनेक नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. आता तो जहीर इकबाल आणि प्रनूतन बहल या दोन नव्या कलाकारांना लाँच करणार आहे. नव्या टॅलेंटला संधी देण्याबाबत तसेच त्याच्या आगामी चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा..

सलमान तू गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटात अभिनय करण्यासोबतच चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे. कोणत्या भूमिकेत असताना जास्त दडपण असते?चित्रपटात अभिनय करण्यापेक्षा चित्रपटाची निर्मिती करणे हे अधिक मेहनतीचे असते. तुम्ही चित्रपटाची निर्मिती करत असताना व्यवहारिक गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतातच. पण त्याचसोबत चित्रपटाची कथा, संगीत, एडिटिंग या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे यासाठी तुम्हाला वेळ देखील अधिक द्यावा लागतो.

सलमान तू आता निर्मिती नंतर दिग्दर्शन करण्याचा काही विचार केला आहेस का?तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक दिग्दर्शक म्हणून माझ्या करियरला सुरुवात करणार होतो. पण ती गोष्ट होऊ शकली नाही यासाठी मी आज देवाचे नक्कीच आभार मानतो.

नोटबुक या चित्रपटाद्वारे जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांनाच लाँच करण्याचे का ठरवले?नोटबुक या चित्रपटाची ऑफर खरी तर मला आली होती. पण गेल्या काही वर्षांत माझी इमेज बदलल्याने मी हा चित्रपट न करण्याचे ठरवले. मला या चित्रपटासाठी जहीर इकबाल आणि प्रनूतन बहल दोघे योग्य वाटल्याने त्यांची या चित्रपटासाठी आम्ही निवड केली. ते दोघेही दिसायला खूप छान आहेत. तसेच ते दोघे मेहनती देखील आहेत. ते दोघे कोणा प्रसिद्ध व्यक्तीची मुले आहेत. म्हणून मी त्यांना संधी दिली असे नाहीये. प्रनूतनचे ऑडिशन मी एका ठिकाणी पाहिले होते. त्याचवेळी मी मोहनिशला फोन करून ती एक चांगली अभिनेत्री असल्याचे सांगितले होते. तसेच मी तिला लाँच करणार असल्याची कल्पना देखील त्यावेळीच त्याला दिली होती. त्यावर तिला अभिनेत्री बनायची असेल तर नक्कीच माझी हरकत नसेन असे मला मोहनिश बोलला होता. 

सध्या अनेक कलाकार वेबसिरिज या माध्यमात काम करत आहेत, तुझा काही विचार आहे का?मला आजवर वेबसिरिजच्या अनेक ऑफर आल्या आहेत आणि त्या मी नाकारल्या देखील आहेत. एवढेच नव्हे तर वेबसिरिजची निर्मिती करण्यासाठी देखील मला विचारण्यात आले होते. पण माझ्या प्रोजेक्टचा कन्टेंट हा हम आपके है कौन सारखा असतो. त्यामुळे तुम्हीच काय ते समजून घ्या.

टॅग्स :सलमान खाननोटबुक