Join us

आपणास माहित आहे का पुरुषाच्या शरीराविषयी ‘हे’ गुपित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

असे म्हणतात की, पुरुषांचा स्वभाव आणि त्याच्याशी संबंधीत असलेल्या गुपित गोष्टी इतिहासात सांगितल्या आहेत. ज्याद्वारे पुरुषाच्या स्वभावाला सहज ओळखले जाऊ शकते. विशेष म्हणजे याचा उल्लेख भविष्यपुराणातही आढळतो.

असे म्हणतात की, पुरुषांचा स्वभाव आणि त्याच्याशी संबंधीत असलेल्या गुपित गोष्टी इतिहासात सांगितल्या आहेत. ज्याद्वारे पुरुषाच्या स्वभावाला सहज ओळखले जाऊ शकते. विशेष म्हणजे याचा उल्लेख भविष्यपुराणातही आढळतो. ज्या पुरुषांची मान प्रमाणापेक्षा जास्त लांब आहे तो व्यक्ती आयुष्यभर समस्यांनी ग्रस्त असतो, या उलट लहान आणि सामान्य मान असलेले पुरुष श्रीमंत असतात आणि जीवनात ते यशस्वीदेखील होतात.ज्या पुरुषांची बेंबी खोलगट आणि गोल असते ते आपल्या आयुष्यात सर्व सुख प्राप्त करतात, मात्र लहान बेंबी असलेले पुरुष जीवनात अनेक समस्यांनी त्रस्त असतात.एखाद्या पुरुषाचे पोट मांसयुक्त तसेच साधे आणि गोल असेल तर असे पुरुष श्रीमंत असतात आणि आयुष्यात सर्व सुखांचा आनंद उपभोगतात. या उलट ज्या पुरुषांचे पोट लांब आणि स्लीम असते असे पुरुष गरीबीचा सामना करतात शिवाय जास्त जेवन करणारे असतात.जर पुरुषांच्या मांडीमध्ये रोम नसेल तर त्यांना भाग्याची साथ मिळत नाही. मात्र ज्या पुरुषांची मांडी लांब, मोठी आणि भारदस्त असते अशांना भाग्याची भरपूर साथ मिळते.ज्या पुरुषांच्या पायाच्या अंगठ्याजवळील बोट अंगठ्यापेक्षा मोठी असेल तर अशा पुरुषांना स्त्री सुख मिळते, याशिवाय जर एखाद्याच्या पायांचे अंगठे खूप मोठे असतात, अशा पुरुषांना भाग्याची सोबत मिळत नाही.ज्या पुरुषांचे खांदे मजबूत आणि विस्तृत असतात, अशांना शुभ मानले जाते. तसेच ज्या पुरुषांची पाठ कासवाच्या पाठीच्या आकारासारखी दिसते, असे लोक भाग्यशाली आणि श्रीमंत असतात. मात्र लांब पाठ असलेले पुरुष कित्येक बंधनात फसलेले असतात.ज्या पुरुषांच्या हाताचे तळवे खोलगट असतात, अशांना वडिलांकडून धन संपतीचे सुख मिळत नाही. तसेच ज्या पुरु षांच्या हाताचे तळवे उभट असतात असे पुरुष दानशूर आणि सुखी असतात.ज्या पुरुषांची हाताच्या पंज्यांची पकड म्हणजे मूठ भारदस्त असते तर ते शुभ मानले जाते. मात्र लहान आणि चपटी मूठ असलेले लोक धनाच्या सुखापासून वंचित राहतात.ज्या पुरुषांचे गुडघे मांसरहित असतात त्यांना लहान लहान यशासाठीदेखील खूप कष्ट करावे लागते.ज्या पुरुषांचे पाय कोमल, लाल रंगाचे आणि घामरहित असतात, असे लोक सर्वप्रकारच्या सुखसोईंचा आनंद उपभोगतात. मात्र ज्यांचे पाय पांढरे, रुक्ष आणि वाकडे नख असलेले असतात अशांना आयुष्यात धनसंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.