Join us  

इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे राज कुंद्रा, करिअरच्या सुरुवातीला करायचा असे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:18 AM

उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला ताब्यात घेतलंय. राज कुंद्रा एक व्यावसायिक आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार राज कुंद्रा 2900 कोटींची संपत्तीचा मालक  आहे.अतिशय आलिशान आयुष्य तो जगतो. 

राज कुंद्रा देशातच नाही तर सातासमुद्रापरही उद्योजक म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. भारतात मात्र राज कुंद्रा एक यशस्वी उद्योजकापेक्षा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती म्हणूनच जास्त ओळखला जातो.स्वत: राज कुंद्राने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की, 'मी आज आयुष्यभर ऐशोआरामात आयुष्य जगू शकतो इतकं मी कमवलं आहे, लहान असताना पैशांसाठी संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे मोठे होवून श्रीमंत बनण्याचे स्वप्न पाहिले होते असे राजने सांगितले होते.

वयाच्या १८ व्या वर्षीच राजने पैसा कमावण्यासाठी धडपड करायला सुरुवात केली होती. खिशात काही पैसे घेऊन राज सगळ्यांत आधी दुबईला गेला. हिरा व्यापा-यांची भेट घेतली, पण त्यातून काही राजला करिअरचा मार्ग मिळाला नाही. तेथून राजने नेपाळ गाठले, काही पारंपरिक शाल विकत घेतल्या आणि त्या यूके मधील काही ब्रांडेड स्टोअरमधून विकण्यास सुरुवात केली.यात राजला चांगलेच यश मिळाले.

 

यानंतर राज पुन्हा दुबईला हिऱ्याचा  व्यवसाय करण्यासाठी गेला. तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. हळूहळू त्याच्या कामात त्याला यश मिळत गेले आणि तो काम करत गेला. राज कुंद्रा विविध क्षेत्रांतील सुमारे 10 कंपन्यांचा मालक आहे . 2004 मध्ये ब्रिटीश मासिकाने श्रीमंत एशियन ब्रिटीशांच्या यादीत राज कुंद्राने198 क्रमांकावर स्थान असल्याचे जाहीर केले होते. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा