Join us  

​don't miss : पाहा, आशादींच्या सूरांनी सजलेले ‘बेगम जान’चे गाणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 10:19 AM

विद्या बालन हिच्या ‘बेगम जान’ या चित्रपटाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटातील पहिले गाणे आज रिलीज करण्यात आले. ‘प्रेम में तोहरे...’ असे शब्द असलेल्या या गाण्यातील आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. होय, कारण बॉलिवूडच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी या गाण्याला शब्दसूरांचा साज चढवला आहे.

विद्या बालन हिच्या ‘बेगम जान’ या चित्रपटाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटातील पहिले गाणे आज रिलीज करण्यात आले. ‘प्रेम में तोहरे...’ असे शब्द असलेल्या या गाण्यातील आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. होय, कारण बॉलिवूडच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी या गाण्याला शब्दसूरांचा साज चढवला आहे. गेली अनेक वर्षे आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाºया आशा दीदींच्या आवाजातील हे गाणे ऐकणे म्हणजे एक अनोखी आनंदयात्रा आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.   आशादींनी २०१३ साली चित्रपटासाठी शेवटचे गाणे गायले होते. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी ‘बेगम जान’च्या निमित्ताने चित्रपटामध्ये त्यांचा सुरेल आवाज आपल्याला ऐकण्यास मिळत आहे. प्रेम आणि वेदना यावर आधारित या गाण्याचे गीतकार आहेत कौसर मुनीर आणि या गाण्याला संगीत दिले आहे अनु मलिक यांनी. आशादींसोबत काम करण्याबद्दल अनु मलिक यांनी सांगितले की,  माझी प्रकृती ठिक नव्हती म्हणून आशाजी मला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी मला आशादींसोबत काम करायचेच, असे मी माझ्या पत्नीसमोर जाहिर करून टाकले.  चित्रपटाचा दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यालादेखील याबाबत काहीच माहिती नव्हती. मी आयसीयूमधूनच श्रीजितला फोन केला आणि पुढच्या दहा दिवसांत काम सुरु करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गाण्याची धून रेकॉर्ड करून हे गाणे आशाजी गातील, असे मी त्याला सांगितले. त्यालादेखील ही कल्पना आवडली. यानंतर  मी आशाजींना फोन करून माझ्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. ही धून आशादींना खूप आवडली आणि ही धून म्हणजे  हे आशा भोसलेचे पुनर्पदार्पण असेल, असे त्या म्हणाल्या आणि त्यांनी हे गाणे गायलेदेखील.   विद्या बालन, इला अरुण, गौहर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला  ‘बेगम जान’ येत्या  एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे.