Join us

रणबीर कपूरच्या या ‘संजूबाबा लूक’ला भुलू नका! कारण वाचून बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 11:38 IST

रणबीर कपूर सध्या ‘दत्त’(संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक)मध्ये बिझी आहे. या चित्रपटात रणबीर संजूबाबाची भूमिका साकारतोय, हे तुम्हाला नव्याने ...

रणबीर कपूर सध्या ‘दत्त’(संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक)मध्ये बिझी आहे. या चित्रपटात रणबीर संजूबाबाची भूमिका साकारतोय, हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण आता सगळेच रणबीरला संजूबाबाच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतूर आहेत. संजूबाबा व रणबीरच्या चाहत्यांची उत्सुकता तर शिगेला पोहोचली आहे. रणबीर कपूर या बायोपिकमध्ये तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. एक म्हणजे, संजय दत्तचा बॉलिवूड डेब्यू, मग त्याला लागलेले ड्रग्सचे व्यसन आणि नंतर तुरुंगातील शिक्षा. साहजिक रणबीर या सर्व अवतारात कसा दिसतो, याची उत्सुकता आहेच. सध्या रणबीरच्या ‘संजूबाबा लूक’चा एक फोटो असाच वेगाने व्हायरल होतो आहे. अर्थात रणबीरचा हा ‘संजूबाबा लूक’ त्याच्या ‘दत्त’ या चित्रपटातील आहे, असा तुमचा अंदाज असेल तर तुम्ही चूक आहोत.कारण हा फोटो ‘दत्त’च्या सेटवरचा नाही तर बनावट आहे. होय, म्हणजे फोटोशॉप्ड आहे. कुणीतरी खºया फोटोसोबत छेडछाड करत, हा फोटो तयार केला आहे. हा फोटो ओरिजनली संजय दत्त याचाच आहे. संजय कोर्टाच्या पेशीला पोहोचला त्यावेळचा हा फोटो आहे. याच ओरिजनल फोटोवर रणबीरचा चेहरा फोटो फिट करण्याची करामत केली गेली आहे. त्यामुळे हा फोटो पाहिल्यापाहिल्या तो ‘दत्त’ चित्रपटाचा लूक आहे, असे समजण्याची घाई करू नका.ALSO READ : संजूबाबाच्या बायोपिकने वाढवली मान्यता दत्तची चिंता? रणबीर कपूरचा वाढला वैताग? तसे खरे सांगायचे तर रणबीरचा या चित्रपटातील लूक या फोटोशी बराच मिळता जुळता असणार आहे. याआधी या बायोपिकच्या सेटवरचे रणबीरचे फोटो लिक झाले होते. ते पाहून रणबीरने या चित्रपटासाठी बरीच मेहनत केल्याचे अगदी स्पष्ट दिसते. चित्रपटाचे शूटींग अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ एका गाण्याचे शूटींग तेवढे बाकी आहे. बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे. संजयचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल तर आई नर्गिस यांच्या भूमिकेत अभिनेत्री मनीषा कोईराला दिसणार आहे. याशिवाय सोनम कपूर, अनुष्का शर्मा यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.