Join us  

मेरे नसीब में...! दिशा पटानीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात...!!  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 5:39 PM

सोशल मीडियावर सुपरडुपर हिट...

ठळक मुद्दे मागील वर्षी ‘मलंग’ या सिनेमात ती झळकली होती. याशिवाय सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमातही दिशाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

बॉलिवूडची ग्लॅम डॉल दिशा पटानी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. आता चर्चा कसली तर दिशाच्या नव्या गाण्याची. होय, दिशाचे ‘मेरे नसीब में’ या गाण्याचा व्हिडीओ रिलीज झाला असून या गाण्याने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिशाचे हे गाणे सोशल मीडियावर सुपरडुपर हिट झाले आहे. बॉलिवूडच्या सुपरहिट गाण्याचा रिमेक असलेल्या या गाण्यात दिशा अगदी हटके लूकमध्ये दिसतेय. तिच्या डान्सबद्दल तर विचारू नका. गाण्यातील तिच्या डान्स मुव्ह्सनी चाहत्यांना वेड लावले आहे.  दिशाने ‘मेरे नसीब में’ हे गाणं आपल्याच यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहे.   शनिवारी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत 3 लाख 80 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले. 

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती सलमानसोबत दिसणार आहे. ती सध्या ‘राधे: यूवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात व्यग्र आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय  नागिन आणि रणबीर कपूरसोबत लव रंजन दिग्दर्शित एका  चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

 मागील वर्षी ‘मलंग’ या सिनेमात ती झळकली होती. याशिवाय सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमातही दिशाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी  या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असलेली दिशा रोज नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :दिशा पाटनी