Join us  

टायगर श्रॉफ नाही तर दुसऱ्या कोणासोबत डिनर डेटला गेली होती दिशा पटानी, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 6:43 PM

दिशा पटानीने नुकतीच डिनर डेटसाठी टायगर श्रॉफ याच्यासह न जाता दुसऱ्या व्यक्तीसोबत स्पॉट झाली.

अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉट फोटो व व्हिडीओंमुळे. मात्र आता यामुळे चर्चा होत नाहीये तर चक्क दिशा टायगरच्या बहिणीमुळे चर्चेत आली आहे. दिशा पटानीने नुकतीच डिनर डेटसाठी टायगर श्रॉफ याच्यासह न जाता त्याची बहिण कृष्णासोबत स्पॉट झाली.

यावेळी दिशा तिच्या बॉयफ्रेन्डसोबत गेली असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. यासाठी मुंबईत हॉटेलबाहेर गर्दी पहायला मिळाली. दिशा आणि कृष्णाचे हातातहात घालून चालतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दिशा पटानी आणि कृष्णा श्रॉफ या दोघांची चांगली मैत्री आहे. रेस्टॉरंटमध्ये जाताना या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून चालत होत्या. डिनर डेटसाठी दिशाने क्रॉप टॉप आणि स्कर्टची निवड केली. तर टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने ब्लॅक टॉप ज्यामध्ये तिने डेनिम शॉर्ट्स आणि बूट्स परिधान केले होते. या दोघी डिनर डेटवर पोहचल्या नंतर त्यांच्यापाठोपाठ तिथे टायगर श्रॉफदेखील पोहचला. मात्र यावेळी दिशा कृष्णा आणि तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे. तसेच अभिनेता जॉन अब्राहमसोबत 'एक विलेन द रिटर्न्स' मध्ये ती झळकणार आहे. सध्या दिशा दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. दिशा आणि टायगरचा 'हिरोपंती २' हा चित्रपट ३ डिसेंबर २०२१मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसंच गणपत या सिनेमात देखील टायगर झळकणार आहे. बागी सिनेमाच्या यशानंतर टायगर बागी ४ यासिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे

टॅग्स :दिशा पाटनीटायगर श्रॉफ