Join us  

Disha Patani Birthday Special : टायगर श्रॉफच्याआधी या अभिनेत्यासोबत नात्यात होती दिशा पटानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:42 PM

दिशा आणि या अभिनेत्याचे जवळजवळ एक वर्षं अफेअर सुरू होते. पण काही कारणास्तव त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देदिशा पटानी एकेकाळी प्रसिद्ध टिव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सध्या पार्थ एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये अनुरागची भूमिका साकारत आहे.

'बागी २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे रसिकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. दिशाचा आज वाढदिवस असून दिशाबाबत काही खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच रंगलेली असते. त्यांना अनेकवेळा रेस्टॉरंटमध्ये अथवा मल्टीप्लेक्समध्ये पाहाण्यात येते. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त असल्याचे म्हटले जाते. पण आमच्यात केवळ मैत्री असल्याचे या दोघांनी अनेकवेळा सांगितले आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात टायगरने त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. त्यावेळी करणने त्याला तू दिशाला डेट करत आहेस का असे विचारले होते. त्यावर माझे इंडस्ट्रीत खूपच कमी फ्रेंड्स आहेत. दिशा ही त्यामधीलच एक फ्रेंड आहे असे त्याने उत्तर दिले होते.

टायगरच्याआधी दिशा एका अभिनेत्यासोबत नात्यात होती. हा अभिनेता छोट्या पडद्यावर प्रचंड प्रसिद्ध असून त्याची एक मालिका चांगलीच गाजत आहे. दिशा पटानी एकेकाळी प्रसिद्ध टिव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सध्या पार्थ एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये अनुरागची भूमिका साकारत आहे.

दिशा तिच्या मॉडेलिंगच्या काळात जवळपास एक वर्ष पार्थला डेट करत होती. पण अचानक या दोघांचं ब्रेकअप झालं. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ दिशाला चीट करत होता आणि याबाबत दिशाला समजल्यावर तिने पार्थ पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण या दोघांनीही याबाबत बोलणं टाळलं.

टॅग्स :दिशा पाटनी