Join us

‘दिलरुबा’ची लेक आता अभिनयाच्या क्षेत्रात ठेवणार पाऊल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 11:01 IST

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा रसिकांना खळखळून हसवणारा एक अभिनेता म्हणजे राकेश बेदी. छोट्या पडद्यावर श्रीमान श्रीमती मालिकेत ...

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा रसिकांना खळखळून हसवणारा एक अभिनेता म्हणजे राकेश बेदी. छोट्या पडद्यावर श्रीमान श्रीमती मालिकेत राकेश बेदी यांनी साकारलेली 'दिलरुबा' या भूमिकेनं रसिकांना खळखळून हसवलं. सध्या राकेश बेदी 'भाभीजी घर पर है' या मालिकेत अंगूरी भाभीच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.आता राकेश बेदी यांची कन्या आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयाची नवी इनिंग सुरु करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे.राकेश बेदी यांची कन्या रिद्धीमा बेदी तिच्या अभिनय पदार्पणाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. 'तेरी कहानियाँ' नावाच्या म्युझिक व्हिडीओमधून रिद्धीमा बेदी अभिनयाच्या करियरची सुरुवात करणार आहे.या व्हिडीओमध्ये रिद्धीमासह ट्रॉयडिन गोम्स आणि आरिफ सईद हेसुद्धा झळकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिद्धीमा अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा विचार करत होती. मात्र ती एका चांगल्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत होती. तेरी कहानियाँ या म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून तिच्यासाठी ही संधी चालून आलीय. या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन मनीष निरवाल करत असून व्हिडीओला राघव दत्त यांचं गीत लाभलं आहे. रिद्धीमा बेदी ही सोशल मीडियावरही बरीच एक्विटव्ह असते. ती कायमच आपले स्टायलिश फोटो सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. रिद्धीमाला सेल्फीचीही बरीच हौस आहे. त्यामुळे तिचं इन्स्टाग्राफ अकाऊंट सेल्फींनी फुल्ल भरलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या वडिलांप्रमाणेच स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचं रिद्धीमाचं स्वप्न आहे. राकेश बेदी यांनी 1984 साली ये जो हैं जिंदगी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. मात्र श्रीमान श्रीमती या मालिकेनं त्यांना बरीच लोकप्रियता मिळवून दिली. यासोबतच त्यांनी राहत, हम सब एक है, येस बॉस, गुब्बारे, एफआयआर, शुभविवाह, कुबूल है, खिडकी, यारों का टशन अशा मालिकांमध्येही काम केलं होतं. याशिवाय विविध सिनेमातील त्यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या आहेत.