Join us  

"दिल की पूरानी सडक"...सिनेमाचे दुसरे गाणे प्रदर्शित, संजय दत्तच्या चाहत्यांसाठी ठरणार ट्रीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:54 PM

पहिल्या ‘सडक’ सिनेमातील संजय दत्त आणि पूजा भट्टच्या एका सीनने या गाण्याची सुरूवात होते.

आलिया भट्ट, आदित्य कपूर आणि संजय दत्त स्टारर फिल्म 'सडक 2' सध्या सध्या चर्चेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरनंतर  काही  दिवसांपूर्वीच 'तूम से ही' हे गाणं प्रदर्शित करण्यात आले होते. त्याचपाठोपाठ आता दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ''दिल पुराणी सडक'' असे हे नवीन गाणे आहे. संजय दत्तच्या चाहत्यांसाठी हे गाणे ख-या अर्थाने ट्रिट ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक, या गाण्याच्या सुरूवातीला संजय दत्तचा जुना लूक दिसत आहे. पहिल्या ‘सडक’ सिनेमातील संजय दत्त आणि पूजा भट्टच्या एका सीनने या गाण्याची सुरूवात होते. त्यामुळे जुना 'सडक' सिनेमा आठवल्याशिवाय राहत नाही. मुखर्जी आणि उर्वी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. तर  केके पुन्हा एकदा लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. त्याचबरोबर 'दिल की पुराणी सडक' गाणे विजय विजवत यांनी लिहिले असून  सोनी म्युझिक बॅनरने हे गाणे प्रदर्शित केले आहे. महेश भट्ट दिग्दर्शित हा सिनेमा 28 ऑगस्टला  डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सिनमाच्या माध्यमातून  महेश भट्ट पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत. 'सडक 2' प्रदर्शित झाल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

१९९१ मध्ये 'सडक' हा सिनेमा पदर्शित झाला  होता. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. यातील म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या सिनेमाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते.

 

या सिनेमात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत 'सडक२'मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जाणार आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे.

टॅग्स :सडक 2संजय दत्त