Join us  

‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस दिगांगना सूर्यवंशीचा एकाच दिवशी दोन चित्रपटांतून डेब्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 5:10 PM

‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस तुम्हाला आठवते? आपल्या लांबसडक केसांमुळे लक्ष वेधून घेणारी तिच ती दिगांगना सूर्यवंशी. ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगनाने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय. 

‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस तुम्हाला आठवते? आपल्या लांबसडक केसांमुळे लक्ष वेधून घेणारी तिच ती दिगांगना सूर्यवंशी. ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगनाने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय. विशेष म्हणजे, दिगांगनाचे एक नाही तर दोन चित्रपट एकाचं दिवशी प्रदर्शित होत आहेत. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे येत्या १२ आॅक्टोबरला प्रदर्शित होत आहेत. ‘जलेबी’ आणि ‘फ्राय डे’ असे या चित्रपटांचे नाव. साहजिकचं दिगांगना प्रचंड उत्सूक आहे.अलीकडे एका मुलाखतीत तिने ही उत्सुकता बोलून दाखवली. सलमान सरांच्या सल्ल्यानुसार, मी बॉलिवूडची तयारी केली. गेल्या काही महिन्यांत मी वजनही कमी केले. छोट्या पडद्याबद्दल आणि याठिकाणी काम करत असलेल्या कलाकारांबदद्ल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. मी छोट्या पडद्यावर काम करणारचं नाही असे नाही. पण टीव्हीवर काम करत असाल तर बॉलिवूडमध्ये काही नवे तुम्हाला आॅफर केले जात नाही, हा अनुभव आहे़, असे ती म्हणाली. 

‘जलेबी’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्स द्वारा निर्मित हा चित्रपट पुष्पदीप भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात रियाचक्रवर्ती, दिवांगना सूर्यवंशी आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. ‘फ्रायडे’बदद्ल सांगायचे तर यात दिगांगनाला गोविंदा आणि वरूण शर्मासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. हा चित्रपट अभिषेक डोगरा दिग्दर्शित करतोय.टीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’मध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती. आता हीच दिगांगना बॉलिवूडमध्ये किती यशस्वी होते, ते बघूच. याशिवाय एकाच दिवशी रिलीज होणाऱ्या तिच्या दोन डेब्यू चित्रपटांपैकी कोणता चित्रपट तिला यश मिळवून देतो, तेही बघूच.

टॅग्स :दिगांगना सूर्यवंशीजलेबी