जॅकलीन फर्नांडिसचा नवा हॉट लूक तुम्ही बघितला काय? नसेल तर पहा !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 19:36 IST
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती आरशासमोर उभे राहून पोज देताना दिसत आहे.
जॅकलीन फर्नांडिसचा नवा हॉट लूक तुम्ही बघितला काय? नसेल तर पहा !!
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती आरशासमोर उभे राहून पोज देताना दिसत आहे. या फोटोचे वैशिष्ट्ये म्हणजे तिची हेअर स्टाइल असून, छोट्या केसांमध्ये जॅकलीन खूपच हॉट दिसत आहे. जॅकलीनने हा लूक तिच्या आगामी ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटासाठी धारण केला आहे. हा फोटो पोस्ट करताना जॅकलीनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्याला माझे लांब केस आवडायचे, त्यामुळेच मी माझे कसे छोटे केले’ यावेळी जॅकलीनने तिच्या आगामी ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटालाही टॅग केले. जॅकलीन नव्या लूकने तिच्या बोल्ड अंदाजाचा परिचय देताना दिसत आहे. जॅकलीनच्या या पोस्टला आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले आहे. वास्तविक जॅकलीन नेहमीच तिच्या या अंदाजामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. कारण ती तिच्या सर्व चित्रपटांसाठी अभिनयाबरोबरच नव्या लूककरिताही ओळखली जाते. यावेळेस तिने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या बॅकलेस टॉपमध्ये बघावयास मिळत आहे. फोटोत ती खूपच हॉट दिसत असून, चाहत्यांकडून त्यास लाखोंच्या संख्येत पसंत केले जात आहे. या अगोदरही तिने पोल डान्सचा व्हिडीओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट २५ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. जॅकलीन या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्याकरिता तिने तिचा लूकही बदलला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती ज्या-ज्या ठिकाणी जात आहे, तिथे आपल्या सुंदर स्माइल आणि लुक्सने ती चाहत्यांची मने जिंकत आहे. जॅकलीनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे १५ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे सुंदर फोटो आणि मस्तीच्या मुडमधील सेल्फी चाहत्यांसाठी पोस्ट करीत असते. तिच्या याच फोटोंमुळे जॅकलीन सोशल मीडियावरील चर्चेतला चेहरा बनला आहे.