आता सनी पाजी शेअर केलेल्या या फोटोविषयी बोलायचे झाल्यास, त्याने हा फोटो मनाली येथून शेअर केला आहे. येथे तो त्याच्या मुलाच्या आगामी ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सनी या चित्रपटातून त्याच्या मुलाला लॉन्च करण्याची तयारी करीत असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तो स्वत:च सांभाळत आहे. असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट एक लव्ह स्टोरी आहे. ज्यामधून देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. काही दिवसांपूर्वीच सनी पाजीने ट्विटरवर आपल्या मुलाचा फोटो शेअर करून त्याच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा केली होती. त्यानंतर बॉलिवूडने देओलचे भरभरून कौतुक करीत त्याचे इंडस्ट्रीमध्ये वेलकम केले होते. काहीही असो सनी पाजीचा हा नवा अवतार सध्या चर्चेचा विषय असून, त्याचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड भावत आहे.#selfie#onset#ppdkp#palpaldilkepaas#manali#workmode#worklife#moments#memories#life#shooting#filmspic.twitter.com/I8N8rRPm4P— Sunny Deol (@iamsunnydeol) June 3, 2017
दमदार डायलॉगचा धनी सनी देओलचा हा नॉटी अंदाज तुम्ही बघितला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 19:42 IST
हल्लीचे तारे-तारका सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असल्याचे आपण वेळोवेळी बघत आलो आहोत. आता त्यांना टक्कर देण्यासाठी ८० च्या दशकातील ...
दमदार डायलॉगचा धनी सनी देओलचा हा नॉटी अंदाज तुम्ही बघितला का?
हल्लीचे तारे-तारका सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असल्याचे आपण वेळोवेळी बघत आलो आहोत. आता त्यांना टक्कर देण्यासाठी ८० च्या दशकातील एक सुपरस्टार सोशल मीडियावर सरसावला आहे. होय, आम्ही सनी पाजी अर्थात सनी देओलविषयी बोलत आहोत. आता तुम्ही म्हणाल की, सनी देओल अन् सोशल मीडिया कसं शक्य आहे? याचं उत्तर तुम्हाला सनी पाजीचे ट्विटर अकाउंट बघितल्यानंतर मिळेल. कारण सनी पाजी दर दिवसाला काही ना काही पोस्ट करत असतो. आपल्या फॅन्सशी कनेक्ट राहण्यासाठी तो दररोज ट्विट करीत असतो. यासाठी तो आताच्या नव्या-तरण्या स्टार्सप्रमाणे पाउटही बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकताच त्याने पाउट बनवितानाचा एक फोटो शेअर केला असून, तो बघून त्याच्या फॅन्सकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वास्तविक सनी पाजीची इमेज आक्रमक अन् अॅक्शन हीरोची आहे. अशात त्याने पोस्ट केलेला पाउट फोटो अनेकांना गमतीशीर वाटत आहे. फोटो बघून चित्रपटात दमदार डायलॉग मारणारा सनी देओल हाच काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण चित्रपटात गुंडांना मारण्याच्या गोष्टी करणारा सनी पाउट करताना भलताच दिसत आहे. अर्थात त्याचा हा फनी अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. कदाचित सनी देओलला सोशल मीडियाची ताकद लक्षात आल्यानेच तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाला असावा. असो, सनी पाजी सोशल मीडियावर असल्याने त्याच्या चाहत्यांना त्याच्याशी टचमध्ये राहण्यास मदत होत आहे हे नक्की.