Join us

सैफ-करिनाच्या लाडक्या तैमूरचा डुप्लिकेट तुम्ही बघितला काय? पहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 18:43 IST

सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टार किड्सपैकी एक असलेल्या तैमूर अली खान सध्या त्याच्या डुप्लिकेटवरून चर्चेत आला आहे. व्हिडीओ पहा तुमच्याही लक्षात येईल.

अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर-खानचा लाडका तैमूर सध्या जबरदस्त चर्चेत असलेला स्टारकिड आहे. दिवसाआड तैमूर कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. कारण तैमूर एवढा गोंडस दिसतो की, त्याची एक झलक पाहण्यासाठी सैफ-करिनाचे चाहते आतुर असतात. आज आम्ही तैमूरविषयी अशीच एक मजेशीर बातमी तुम्हाला सांगणार आहोत. होय, अगदी तैमूरसारखेच दिसणारे एक बाळ असून, सध्या तैमूरमुळे तेदेखील चांगलेच चर्चेत आले आहे. होय, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या या बाळाचे नाव इनाया शोएब आहे. इनाया एक मुलगी असून, तिचा चेहरा तैमूरशी तंतोतंत जुळणारा आहे. इनायाचा रंग, तिचा लूक, हाइट, डोळे सर्वकाही तैमूरसारखे दिसते. मम्मी करिनाने जर इनायाला बघितले तर तिलादेखील तैमूर आणि तिच्यात फरक करणे अवघड होईल, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. इनाया आणि तैमूरमधील आणखी एक मजेशीर बाब म्हणजे दोघांचा जन्म १५ दिवसांच्या अंतराने झाला आहे. इनायाचा जन्म गेल्या वर्षी ५ डिसेंबर २०१६ रोजी झाला, तर तैमूरचा जन्म २० डिसेंबर २०१६ चा आहे. केवळ १५ दिवसांनी इनाया तैमूरपेक्षा मोठी आहे. इनायाचे आणि तैमूरचे डोळे सारखेच आहेत. दोघांचे निळे डोळे असल्याने त्यांच्यामध्ये अधिकच साधर्म्य निर्माण करते. काही दिवसांपूर्वी तैमूर आणि इनायाचा एक फोटो इन्स्टाग्राम शेअर करण्यात आला होता. या फोटो कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले होते की, ‘इनाया सेम अ‍ॅज तैमूर’! सध्या हा फोटो सर्वत्र व्हायरल होत असून, त्यास नेटिझन्सकडून जबरदस्त पसंत केले जात आहे. दरम्यान, तैमूरचे मम्मी-पापा यांच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास पापा सैफचा नुकताच ‘शेफ’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नाही. तर मम्मी करिना कपूर सध्या तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तैमूरदेखील मम्मी करिनासोबत शूटिंगच्या सेटवर जात असतो. काही दिवसांपूर्वीच तो मम्मी करिनासोबत दिल्ली येथे गेला होता.