Join us  

ना आलिया ना करिना नयनतारा ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, जवानसाठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मनाधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 10:10 AM

नयनतारा हिने जवान चित्रपटासाठी तगडी फिस घेतली आहे.

सध्या जिकडेतिकडे शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची चर्चा आहे. 'पठाण'नंतर किंग खानच्या 'जवान' चित्रपटासाठी चाहते आतुर आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 'जवान'चा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर किंग खानच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. गेल्या बऱ्याच दिवसापासून 'जवान'च्या प्रतिक्षेत असलेल्या शाहरुखच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'जवान' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटली  कुमराच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे बजेट सुमारे ३०० कोटी असून हा शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण या चित्रपटाचे बजेट जवळपास 270 कोटी रुपये होते.

साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.  नयनतारा हिने जवान चित्रपटासाठी तगडी फिस घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार नयनतारा हिने तब्बल 11 कोटी रूपये जवान चित्रपटासाठी घेतले आहेत.. गेल्या वर्षी तिने साऊथ दिग्दर्शक विघ्नेश सिवनसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाला शाहरुख खानने हजेरी लावली होती

दरम्यान शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधील तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांना हजारो रुपये मोजावे लागणार आहेत. जवानच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधील एका तिकिटाची किंमत तब्बल अडीच हजारांच्या घरात आहे. मुंबईत जवानचं एक तिकीट २ हजार ३०० तर दिल्लीत या तिकिटाची किंमत २ हजार ४०० रुपये इतकी आहे. तरीदेखील जवानची अर्धी तिकिटे विकली गेल्याची माहिती आहे. 

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खाननयनतारा