Join us  

अमिताभ बच्चन यांच्याबद्दलची ही गोष्ट वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 3:15 PM

अमिताभ एक खूप चांगले अभिनेते असण्यासोबतच एक खूप चांगले कवी, गायक आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, या गोष्टींसोबतच अमिताभ बच्चन यांच्यात आणखी एक कौशल्य आहे.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशहा म्हटले जाते. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार मानले जाते. त्याचसोबत त्यांनी छोट्या पडद्यावर देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या अनेक सिझनचे त्यांनी सूत्रसंचालन केले असून हे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावते. अमिताभ बच्चन हे ७५ वर्षांचे झाले असले तरी आजही ते तितक्याच जोमाने काम करतात. ते आजही अनेक चित्रपटांमध्ये काम करतात. तसेच अनेक जाहिरातींचा भाग असतात. आज बॉलिवूडमधील सगळ्यात बिझी कलाकारांमध्ये त्यांची गणना केली जाते.  

अमिताभ एक खूप चांगले अभिनेते असण्यासोबतच एक खूप चांगले कवी, गायक आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, या गोष्टींसोबतच अमिताभ बच्चन यांच्यात आणखी एक कौशल्य आहे. अमिताभ बच्चन हे डावखुरे आहेत. त्यामुळे अमिताभ डाव्या हातानेच लिहितात. पण त्यासोबत त्यांना उजव्या हाताने देखील लिहिता येते आणि ते देखील अतिशय सुंदर हस्ताक्षरात. जगभरातील खूपच कमी लोकांना दोन्ही हातांनी लिहिता येते.

ठग्स ऑफ हिंदुस्थान हा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात प्रेक्षकांना पहिल्यांदाच आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र पाहाता येणार आहे. यासोबतच कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालाय. ट्रेलरच्या सुरूवातीलाच ‘आझाद’च्या रूपात अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार दिसतो. तो पाहून अंगावर शहारे येतात. या आझादला पकडण्यासाठी इंग्रजांना आझादसारखाच बहादूर ठग हवा असतो. हा ठग म्हणजे आमिर खान. आमिर खानची या ट्रेलरमध्ये एन्ट्री जबरदस्त आहे. त्याचा विनोदी अंदाज मनाला भावतो. पुढे आमिर आणि अमिताभची जुगलबंदीही ट्रेलरमध्ये दिसते. या चित्रपटातील अमिताभ यांचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही. 

टॅग्स :अमिताभ बच्चनठग्स आॅफ हिंदोस्तानआमिर खान