Join us  

'हम दिल दे चुके सनम' 22 वर्ष पूर्ण, तुम्हाला माहितीय का सिनेमात ऐश्वर्या राय नव्हे तर दुसरीच अभिनेत्री साकारणार होती नंदिनी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 12:32 PM

ऐश्वर्याने साकारलेल्या नंदिनीची भूमिका आधी दुसर्‍या अभिनेत्रीला ऑफर केली गेली होती. म्हणजेच या भूमिकेसाठी ऐश्वर्या पहिली पसंती नव्हती.

ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अजय देवगन सारख्या स्टारकास्टने सजलेल्या या हम दिल दे चुके सनम चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.  1999 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या या सिनेमानं ऐश्वर्या रायला नवी ओळख मिळवून दिली. सिनेमात साकारलेल्या  नंदिनीनं ऐश्वर्या फक्त एक शोभेची बाहुली अशी टीका करणा-यांची तोंडं कायमची बंद करुन टाकली.प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याच्यासाठी नव-याला सोडून सातासमुद्रापार जाण्याची तयारी असलेली या नंदिनीनं रसिकांवर जादू केली.

सिनेमात ऐश्वर्याच्या अभिनय कौशल्यासोबतच डान्सचंही तितकंच कौतुक झालं.या सिनेमानं रसिकांवर जादू केली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं. 'हम दिल दे चुके सनम'च्या यशानंतर ऐश त्या काळातली बिझी एक्ट्रेस बनली.. ऐशचे एकामागून एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकत होते. पण तुम्हाला माहिती आहे का? ऐश्वर्याने साकारलेल्या नंदिनीची भूमिका आधी दुसर्‍या अभिनेत्रीला ऑफर केली गेली होती. म्हणजेच या भूमिकेसाठी ऐश्वर्या पहिली पसंती नव्हती. 

संजय लीला भन्साळीने ऐश्वर्याआधी करीना कपूरला ही भूमिका ऑफर केली होती. पण त्याचवेळी करिना उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असल्यामुळे तिने ही ऑफर नाकारली होती जर करिनाने होकार दिला असता तर आज तिचा हा डेब्यू चित्रपट ठरला असता.करिना कपूरनेही बॉलिवूडमध्ये आज आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध भूमिका साकारत तिने स्वतःला सिद्ध केले आहे. 

नवाब सैफअली खानसह लग्न करत तिच्या आयुष्याला सुरुवात केली. करिना दोन मुलांची आई आहे.सध्या तिचे मदरहुड ती एन्जॉय करत आहे. प्रेग्नंसीमध्येही तिने सिनेमाचे शूटिंग केले होते. लवकरच तिचा आमिरखानसोबतचा 'लालसिंग चड्ढा' चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.  अलीकडेच या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. याशिवाय त्यांच्याकडे करण जोहरचा 'तख्त' हा चित्रपटदेखील आहे. 

तर दुसरीकडे चित्रपटसृष्टीची सुपर हिरोईन ठरलेली ऐश आता पूर्णपणे आपल्या संसारात आणि आराध्यामध्ये दंग झाली... त्यामुळं तिला सुपर मॉम हे नावंही पडलं...सा-या जगाला वेड लावणा-या ऐशवर सिनेमाशी संबंधित विविध राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय पुरस्कारांचा वर्षाव झालाय.. पद्मश्री पुरस्कारानेही ऐशला गौरवण्यात आलं... तिच्या योगदानाची दखल घेऊन लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसाद म्युझिममध्ये तिचा मेणाचा पुतळा साकारण्यात आलाय.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसलमान खान