Join us  

Palak Tiwari ने सावत्र वडिलांना मारला टोमणा? म्हणाली - घरी अजून कुणी कमावलं असतं तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 12:00 PM

Palak Tiwari : श्वेता गेल्या अनेक वर्षांपासून सिंगल मदर बनून घर चालवत आहे. एकटी दोन्ही मुलांना सांभाळ करत आहे. श्वेताची मुलगी पलक तिवारी आता मोठी झाली.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचं पर्सनल आयुष्य किती चढउताराचं आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. दोनदा लग्न झाल्यावर तिला दोन्ही वेळा पतींपासून वेगळं व्हावं लागलं. दोन्ही लग्नातून श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) २ अपत्य आहेत. श्वेता गेल्या अनेक वर्षांपासून सिंगल मदर बनून घर चालवत आहे. एकटी दोन्ही मुलांना सांभाळ करत आहे. श्वेताची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) आता मोठी झाली. नुसती मोठीच झाली नाही तर ती स्टारही झाली आहे. आता तिला घर चालवण्यात आईची मदत करायची आहे.

पलकला आईसोबत घराची जबाबदारी घ्यायची आहे. काम करायचं आहे. आनंदाची बाब म्हणजे पलकला सध्या भरपूर कामही मिळत आहे. पलकचे एकापाठी एक धमाकेदार म्युझिक व्हिडीओहीजही येत आहेत. दुसरीकडे सोशल मीडिया सेंसेशन बनलेल्या पकलच्या सौंदर्याने फॅन्स भारावून गेले आहेत. पलकने आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वाटचालीबाबत सांगितलं. यावेळी पलक तिचा सावत्र पिता अभिनव कोहलीवरही बोलली. 

पलक तिवारी म्हणाली की, माझा अंतिम उद्देश आपल्या परिवारासाठी ते सगळं करावं, ज्याची त्यांना कधीही चिंता करण्याची गरज पडू नये. कारण माझी आईच नेहमी एकटी कमावणारी होती. मला तिच्या प्रेशर कमी करायचं आहे. मला खूप सक्षम व्हायचंय आणि खूप कमाई करायची आहे. जेणेकरून मी माझ्या भावाला चांगलं शिक्षण देऊ शकेन. मी माझी आई, आजी-आजोबांचे मेडिकल बिल भरू शकेन. जे काही माझ्या परिवाराला हवं ते मी त्यांना देऊ शकणारी व्यक्ती बनायचं आहे.

पलक म्हणाली की, आईला रेयांशला घरी ठेवणं अजिबात पसंत नाही. एका रात्रीसाठीही ती त्याला घरी ठेवत नाही. पलक म्हणाली की, आई आणि रेयांशमध्ये स्वीट बॉंडिंग आहे. जर घरात दुसरं कुणी कमावत असेल तर ती रेयांशसोबत घरी थांबू शकेल. मला माझ्या भावाबाबतही तेच वाटतं. मला माहीत आहे की, आई रेयांशला घरी सोडून जाते आणि काम करते. जेणेकरून आमचं पोट भरू शकेल. मला माहीत आहे ती खूप काम करते.

पलक तिवारीच्या या बोलण्यावरून हे दिसून येतं की, जर तिच्या आईशिवाय दुसरं कुणी कमावणारं असतं तर तिच्या घराची स्थिती वेगळी असती. श्वेता तिवारीचं जेव्हा अभिनवसोबत लग्न मोडलं नव्हतं तेव्हाही श्वेताच कमावत होती. आता ती आणि अभिनव वेगळे झाले आहेत. दोघांचा मुलगा रेयांशबाबत लीगल केस सुरू आहे. श्वेताने अभिनववर आरोपा लावला होता की, तो मुलांच्या संगोपनात एकाही पैशाची मदत करत नाही.  

टॅग्स :पलक तिवारीश्वेता तिवारी