Join us  

पुरुषांच्या गुप्तांगावर प्रदूषणामुळे दुष्परिणाम; वैज्ञानिकांच्या दाव्यावर दीया मिर्झाची मार्मिक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 12:06 PM

Dia Mirza Tweet On Mens Private Part : दीया नेहमीच आपल्या ट्वीटद्वारे लोकांना निसर्गाविषयी जनजागृती करताना दिसते. वर्षाच्या सुरुवातीलाच दीया म्हणाली होती की कोविड -१९ वेकअप कॉल आहे.

दीया मिर्झा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दीयाचे हे दुसरे लग्न आहे.नुकतेच दुस-यांदा लग्न करत तिने आयुष्याला नवीन सुरुवात केली आहे.सध्या ती मालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतेय. तिच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. व्हॅकेशनदरम्यानच तिने आणखीन एक ट्विट करत चर्चेत आली आहे. सध्या तिच्या फोटोंपेक्षा तिच्या ट्विटनेच जास्त लक्ष वेधून घेतले आहे.

वातावरणात होणा-या बदलांमुळे विषारी रसायने पुरुषांच्या प्रायव्हेट भागावर परिणाम करतात, असं एका संशोधनातून समोर आलंय. त्यावर दीयाने ट्विट केलंय. या माहितीनंतर लोक कदाचित पर्यावरण रक्षणासाठी जागरूक होतील, अशी टिप्पणी तिने केलीय. दियाचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक यावर प्रतिक्रिया देत आपले मतंही मांडत आहेत. दीया नेहमीच आपल्या ट्वीटद्वारे लोकांना निसर्गाविषयी जनजागृती करताना दिसते. वर्षाच्या सुरुवातीलाच दीया म्हणाली होती की कोविड -१९ वेकअप कॉल आहे. आता आपण सर्वांनी पर्यावरण प्रदूषित होण्यापासून वाचण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे असेही तिने सांगितले होते.

 

वैभवशी लग्न करण्यासाठी दीयाने 2019 मध्ये साहिल संघाला घटस्फोट दिला होता. दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही. साहिलला 2019 मध्ये घटस्फोट घेत ती वेगळी झाली होती.

 

 

दीयाचा पती वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

दीया मिर्झाने लग्नात कन्यादान आणि पाठवणीला का दिला नकार? हे आहे कारण

‘लग्न हे दोन जिवांचा आत्मा असतो. या नात्यात प्रेम, आश्चर्य, विश्वास, या गोष्टी असतात. त्यामुळे विधी कोणी केल्या यापेक्षा विधी का करतात, हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मी त्यानुसारच, बदल स्वीकारत मी काही विधींना फाटा दिला तर काही विधी मनापासून केल्या. आजुबाजूला होणा-या बदलांची सुरुवात आपण आपल्या निवडीपासूनच केली पाहिजे.’

टॅग्स :दीया मिर्झा