Join us  

धर्मेंद्र यांनी केला होता घरातील या गोष्टीला विरोध, मग हेमा मालिनी यांनी केले होते असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 6:00 AM

हेमा मालिनी यांनीच ही गोष्ट द कपिल शर्मा शो मध्ये सांगितली.

ठळक मुद्देहेमा मालिनी यांनी सांगितले, “ईशाला व्यावसायिक डान्सर व्हायचे होते. तसेच बॉलिवूडमध्येही करियर करायचे होते. पण धरमजींना त्यांच्या मुलीने डान्स करणे किंवा बॉलिवूडमध्ये येणे पसंत नव्हते. त्याला त्यांचा विरोध होता.”

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी मुलगी ईशा देओलसोबत तिच्या ‘अम्मा मिया’ या आगामी पुस्तकाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहे. एक लेखिका म्हणून ईशाने हे पुस्तक लिहिण्यामागील विचार या कार्यक्रमात मांडला तसेच त्याबाबत काही किस्से देखील सांगितले. त्यानंतर तिने हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील काही मजेशीर किस्सेदेखील सांगितले.  

जेव्हा कपिल शर्माने हेमा मालिनी यांना ईशाचे लहानपण आणि तिच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी विचारले तेव्हा हेमा मालिनी यांनी सांगितले, “ईशाला डान्स, खेळ यांसारख्या अवांतर गोष्टींमध्ये रुची होती. आमच्या घरात आम्ही नृत्याचा रियाज करायचो. त्यामुळे तिला त्यात गोडी निर्माण झाली. तिला व्यावसायिक डान्सर व्हायचे होते. तसेच बॉलिवूडमध्येही करियर करायचे होते. पण धरमजींना त्यांच्या मुलीने डान्स करणे किंवा बॉलिवूडमध्ये येणे पसंत नव्हते. त्याला त्यांचा विरोध होता.”

 हेमा मालिनी यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा धरमजींना मी करत असलेल्या नृत्यप्रकाराबद्दल समजले आणि त्यामुळे माझे आणि माझ्या कामाचे किती कौतुक होते, मान मिळतो हे त्यांना समजले... तेव्हा सुदैवाने त्यांचे मत बदलले आणि त्यांनी आपल्या मुलींचे नृत्य करणे तसेच ईशाचे बॉलिवूडमध्ये येणे या गोष्टी स्वीकारल्या.” 

 या कार्यक्रमात पुढे ईशा देओलने तिच्या पुस्तक लिहिण्यामागील किस्से सांगितले. तिने सांगितले की, माझ्याच घरात मला अशा खूप वेगवेगळ्या पाककृती आढळून आल्या, ज्या नवीन मातांना खूप उपयुक्त ठरू शकतात. हे पुस्तक पूर्ण करायला मला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागला आणि ते लिहित असताना मी दुसर्‍या वेळी गरोदर राहिली होती.

टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीद कपिल शर्मा शोकपिल शर्मा