Join us  

'धडक'च्या क्लायमॅक्समध्ये रसिकांना बसणार धक्का, असा असेल शेवट….

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 9:22 AM

'धडक' सिनेमाच्या रिलीजची तारीख जसजशी जवळ येते आहे तसतशी सिनेमातील एक एक गोष्ट रसिकांसमोर येत आहेत.

ठळक मुद्दे सैराटची रुपेरी पडद्यावरील जादू पाहून बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा हिंदीत रिमेक करण्याचं ठरवलं. परशाचे विहीरीत उडी मारणे, आर्चीचं इंग्लिशमध्ये सांगू का, झिंगाटचं हिंदी वर्जन अशा बऱ्याच गोष्टी धडकमध्ये काही अंशी बदल करुन दाखवण्यात आल्या आहेत.सैराटच्या क्लायमॅक्सने रसिकांसह दिग्गजांना स्तब्ध आणि निःशब्द करुन टाकलं होतं.

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे 'सैराट'ने झिंग झिंग झिंगाटच्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. या सिनेमानं हिंदी चित्रपटसृष्टीवरही मोहिनी घातली. सैराटची रुपेरी पडद्यावरील जादू पाहून बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा हिंदीत रिमेक करण्याचं ठरवलं.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर आणि अभिनेता इशान खट्टर यांना घेऊन सैराट सिनेमाचा रिमेक धडक सिनेमाची घोषणा करणने केली होती. तेव्हापासूनच धडक सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. हा सिनेमा कसा असेल, त्याची कथा, गाणी याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. धडक सिनेमाच्या रिलीजची तारीख जसजशी जवळ येते आहे तसतशी सिनेमातील एक एक गोष्ट रसिकांसमोर येत आहे. सैराटच्या आर्ची आणि परशाप्रमाणेच यांत इशान आणि जान्हवीची जोडी दाखवण्यात आली आहे.

ट्रेलरपासून सिनेमाच्या गाण्यांपर्यंत धडकमध्ये सैराटचीच झलक रसिकांना पाहायला मिळत आहे. गाण्यांचे शब्द हिंदीत बदलले असले तरी संगीतामध्ये अजय-अतुलचीच जादू कायम आहे. परशाचे विहीरीत उडी मारणे, आर्चीचं इंग्लिशमध्ये सांगू का, झिंगाटचं हिंदी वर्जन अशा बऱ्याच गोष्टी धडकमध्ये काही अंशी बदल करुन दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सैराट पाहिलेल्या रसिकांना धडक का पाहावा असा प्रश्न रसिकांना पडला आहे. त्यातच धडक सिनेमाचा क्लायमॅक्ससुद्धा सैराटसारखाच असणार अशा चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत. सैराटच्या क्लायमॅक्सने रसिकांसह दिग्गजांना स्तब्ध आणि निःशब्द करुन टाकलं होतं. त्यामुळे धडक सिनेमाच्या क्लायमॅक्सलाही इशान आणि जान्हवीचा मृत्यू दाखवला जाणार का याची उत्सुकता आहे.

मात्र धडक सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये एक ट्विस्ट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धडक सिनेमात क्लायमॅक्सला रसिकांना एक जबरदस्त धक्का मिळणार आहे. आर्ची आणि परशाच्या हत्येनंतर लहान बाळाला दाखवून नागराज मंजुळेने रसिकांना धक्का दिला होता. असाच धक्का धडक सिनेमात पाहायला मिळेल. यांत धडकचा नायक इशान आणि त्याच्या बाळाचा मृत्यू दाखवला जाईल तर जान्हवी कपूरला जिवंत दाखवलं जाणार असल्याचा क्लायमॅक्स धडक सिनेमात असेल. 

टॅग्स :जान्हवी कपूरधडक चित्रपट