Join us

​देवसेना विसरा; आता साऊथची लक्ष्मी करणार बॉलिवूडवर राज्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 14:27 IST

सध्या मनोरंजन सृष्टीत दाक्षिणात्य अभिनेत्रींचा बोलबाला आहे.  दाक्षिणेतल्या अनेक नट्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहेत. ‘बाहुबली2’मधील देवसेना उर्फ ...

सध्या मनोरंजन सृष्टीत दाक्षिणात्य अभिनेत्रींचा बोलबाला आहे.  दाक्षिणेतल्या अनेक नट्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहेत. ‘बाहुबली2’मधील देवसेना उर्फ अनुष्का शेट्टीनंतर या यादीत आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे. ही अभिनेत्री आहे, लक्ष्मी राय.लक्ष्मी राय ही साऊथची अतिशय हॉट व बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आता ही बोल्ड अभिनेत्री एका बोल्ड बॉलिवूडपटात दिसणार आहे. हा बोल्ड बॉलिवूडपट म्हणजे ‘जुली’चा सीक्वल. ‘जुली’मध्ये नेहा धूपिया दिसली होती. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये नेहाच्या जागी लक्ष्मी राय दिसणार आहे.  लक्ष्मी रायने आपल्या अभिनय कारकिर्र्दीची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. साऊथच्या या गाजलेल्या अभिनेत्रीने अनेक जाहिरातींमध्येही काम केलेय. २००५ मध्ये तामिळ चित्रपट ‘कारका कसडारा’मधून तिने अ‍ॅक्टिंग डेब्यू केले. यानंतर ‘मुनि2 कांचा’,‘मनकथा’,‘रॉक अ‍ॅण्ड रोल’,‘अन्नान थम्बी’,‘हरिहर नगर’,‘नेकू नाकू’, ‘धाम धूम’,‘राजधानी राजा’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.लक्ष्मी राय यापूर्वी ‘अकिरा’मध्ये दिसली होती. सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये असलेल्या या चित्रपटात लक्ष्मी राय महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. आता  ‘जुली2’मध्ये लक्ष्मी लीड रोलमध्ये दिसणार आहे. २००८ मध्ये आयपीएलदरम्यान क्रिकेटपटू महेन्द्र सिंह धोनी आणि लक्ष्मी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. धोनीच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘एम. एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात  लक्ष्मी व धोनी यांच्या प्रेमकथेचा उल्लेख नव्हता. यावर लक्ष्मी खुलेपणाने बोलली होती.  लोक विनाकारण माझ्या भूतकाळाबद्दल बोलत आहेत. मी व धोनी आम्ही दोघेही आपआपल्या आयुष्यात खूप पुढे निघालो आहोत, असे लक्ष्मी म्हणाली होती.