Join us  

​ताप असूनही श्रीदेवी यांनी केले होते ना जाने कहा से आयी है या गाण्याचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 11:26 AM

चालबाज हा श्रीदेवी यांच्या करियरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट मानला जातो. या चित्रपटात त्यांनी अंजू आणि मंजू अशा दोन ...

चालबाज हा श्रीदेवी यांच्या करियरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट मानला जातो. या चित्रपटात त्यांनी अंजू आणि मंजू अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात सनी देओल आणि रजनिकांत यांच्यासोबत त्यांची जोडी जमली होती. या चित्रपटात त्यांच्यावर चित्रीत झालेले ना जाने कहा से आयी है हे गाणे तर चांगलेच गाजले होते. या गाण्यात आपल्याला सनी देओल आणि श्रीदेवी यांना पाहायला मिळाले होते. या गाण्यातील श्रीदेवी यांचे नृत्य, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव यांची चांगलीच चर्चा झाली होती. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेली घटना आजही या चित्रपटाच्या टीमच्या चांगलीच लक्षात आहे.ना जाने कहा से आयी है या गाण्याचे चित्रीकरण दोन दिवस होणार होते. या गाण्याच्या पहिल्या दिवसाचे चित्रीकरण झाल्यानंतर श्रीदेवी यांना खूप ताप भरला होता. त्यांचा ताप १०३च्या आसपास होता. त्यामुळे आता या स्थितीत त्या चित्रीकरण करूच शकणार नाही असे चित्रपटाच्या टीममधील सगळ्यांना वाटत होते. श्रीदेवी यांचा ताप पाहाता निर्मात्यांनी देखील चित्रीकरण पुढे ढकलण्याची तयारी दाखवली होती. पण त्याही अवस्थेत श्रीदेवी यांनी चित्रीकरण पूर्ण केले. या गाण्यात त्यांच्यासोबत असलेले सहकलाकार सनी देओल आणि गाण्याच्या कोरिओग्राफर सरोज खान आणि चित्रपटाच्या सगळ्याच टीमला त्यांना सेटवर पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण हे गाणे पावसातील असल्याने त्यांना चित्रीकरण करताना अजून ताप भरू शकतो असे सगळ्यांचे म्हणणे होते. पण तरीही आजारी असताना देखील त्यांनी या गाण्याचे चित्रीकरण केले. हे गाणे पुढे जाऊन सुपरहिट ठरले होते. आजही हे गाणे लोकांच्या चांगल्याच लक्षात आहे.चालबाज या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता आणि विशेष म्हणजे ना जाने कहा से आयी है या गाण्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांना सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. Also Read : अर्जुन कपूर आता राहाणार बोनी कपूर यांच्यासोबत?