Join us

देसी गर्ल प्रियंका चोपडा बॉॅॅलिवूडला करणार बाय-बाय? जाणून घ्या यामागील सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 21:48 IST

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये आपला जम बसविताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक हॉलिवूडपट साइन करीत असलेली प्रियंका ...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये आपला जम बसविताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक हॉलिवूडपट साइन करीत असलेली प्रियंका गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधून जणूकाही गायबच झाली आहे. विशेष म्हणजे तिने आतापर्यंत एकाही बॉलिवूडपटाची घोषणा केली नसल्याने तिच्या चाहत्यांमध्ये विविध स्वरूपाच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेष म्हणजे सध्या अशा चर्चा रंगत आहेत की, प्रियंकाने बॉलिवूडला बाय-बाय केले असून, हॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले आहे. मात्र आता या चर्चांवर खुद्द प्रियंकानेच उत्तर दिले असून, ते वाचून तिच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळेल, यात शंका नाही. त्याचे झाले असे की, प्रियंकाला टोरॅँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये टीआयएफएफच्या वतीने आयोजित शेअर हर जर्नी समारंभात गेस्ट आॅफ आॅनरने सन्मानित करण्यात आले. असा सन्मान मिळालेली प्रियंका ही बॉलिवूडमधील पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. यादरम्यान तिच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीत प्रियंकाने स्पष्ट शब्दात म्हटले की, मी बॉलिवूड सोडून कुठेही जाणार नाही. केवळ ‘क्वांटिको’च्या एक्सटेंडेड प्रोजेक्टमुळे मी हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. याचा अर्थ मी बॉलिवूड सोडले, असा होत नाही. पुढे बोलताना प्रियंकाने म्हटले की, पुढच्या वर्षी मी दोन बॉलिवूडपटांमध्ये काम करण्याचे निश्चित केले आहे. मात्र जोपर्यंत हे चित्रपट साइन करीत नाही, तोपर्यंत याविषयी काहीही सांगणे घाईचे ठरेल. यावेळी प्रियंकाने असेही म्हटले की, भारत आणि अमेरिका विसरून जा मी तर आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही काम करण्यास उत्सुक आहे. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार प्रियंकाने आणखी एक खुलासा केला आहे. त्यामध्ये म्हटले की, ‘एकवेळा मला असा सल्ला दिला गेला होता की, माझ्या एथनिक लूकमुळे मी चित्रपटांमध्ये काम करायला नको. मात्र तुम्हाला जर संधी मिळत असेल तर ती सोडायला नको, असा विचार मी करते.’प्रियंकाने केलेला हा खुलासा तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच दिलासादायक असणार आहे. शिवाय तिने लवकरात लवकर बॉलिवूडपटांमध्ये झळकावे, अशीही इच्छा तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रियंका सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून, पुढच्या वर्षी एखाद्या बॉलिवूडपटात झळकण्याची शक्यता आहे.