Join us

​भाजपाची ‘पद्मावती’वर बंदीची मागणी; जाणून घ्या काय आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:39 IST

‘पद्मावती’शी संबंधित वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आता ऐन रिलीज आधी या चित्रपटासंदर्भात एक नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे ...

‘पद्मावती’शी संबंधित वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आता ऐन रिलीज आधी या चित्रपटासंदर्भात एक नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. होय, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाला आता गुजरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधाचा सामना करावा लागतोय.गुजरात भाजपाने निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे. या चित्रपटामुळे प्रादेशिक समुदायाच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळे रिलीज आधी हा चित्रपट राजपूत प्रतिनिधींना दाखण्यात यावा, अशी मागणी या पक्षाने केली आहे. केवळ इतकेच नाही तर गुजरात भाजपाने भन्साळींसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. गुजरात भाजपाचे प्रवक्ते आणि राजपूत नेते आय. के. जडेजा यांनी भन्साळींना हे दोन पर्याय सुचवले आहेत. एकतर हा चित्रपट बॅन करावा किंवा गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर तो रिलीज करावा, असे हे दोन पर्याय आहेत. ‘पद्मावती’च्या या विरोधामागे कुठलेही राजकीय कारण नाही. आम्हाला केवळ राणी पद्मावतीशी सबंधित तथ्यांसोबत छेडछाड नको आहे. तीच आमची चिंता आहे. राणी पद्मावती आणि सुल्तान अलाऊद्दीन खिल्जी यांच्यातील काही इंटिमेट सीन्स चित्रपटात असल्याची खबर आहे, असेही ते म्हणाले.ALSO READ: ​दीपिका पादुकोणचे ‘घूमर’ नृत्य पाहून व्हाल दंग! ‘पद्मावती’चे पहिले गाणे रिलीज !!अगदी अलीकडे  जय राजपुताना संघ या राजपूत गटाने ‘पद्मावती’च्या मेकर्सला जाहिर धमकी दिली होती. रिलीज आधी ‘पद्मावती’आम्हाला दाखवला गेला नाही आणि आमच्या संमतीविना तो रिलीज झालाच आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळलेच तर चित्रपटगृहे पेटवून देऊ, असे जय राजपुताना संघाने म्हटले होते.त्याआधीशूटींगच्या अगदी पहिल्या टप्प्यात करणी सेनेने ‘पद्मावती’च्या सेटवर धिंगाणा घातला होता. ‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत गत जानेवारीच्या अखेरिस करणी सेनेने राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’च्या सेटवर हल्ला केला होता. यादरम्यान ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाणही करण्यात आली होती. यानंतर ‘पद्मावती’चा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला होता. पण  काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटचीही तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता.