Join us

​दीपिकाने विनला शिकवले हिंदी ‘आय लव्ह यू’ म्हणायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 17:05 IST

लवकरच दीपिका ‘पद्मावती’चे शूटींग सुरु करतेय. तत्पर्वूी ती ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ झेंडर केज’ या तिच्या हॉलिवूडपटाच्या सेटवर परतलीयं. हॉलिवूड स्टार विन डिझेज याने फेसबुकवर लाईव्ह होत याची माहिती दिली.

प्रियंका चोपडाच नाही तर दीपिका पादुकोण ही सुद्धा बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये व्यस्त झाली आहे. लवकरच दीपिका ‘पद्मावती’चे शूटींग सुरु करतेय. तत्पर्वूी ती ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ झेंडर केज’ या तिच्या हॉलिवूडपटाच्या सेटवर परतलीयं.  हॉलिवूड स्टार विन डिझेज याने फेसबुकवर लाईव्ह होत याची माहिती दिली. दीपिका माझी चांगली मैत्रिण आहे, इथून विनने बोलायला सुरुवात केली.  ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ झेंडर केज’ रिलीज झाल्यानंतर दीपिका कोण आहे, हे अख्ख्या जगाला कळेल, अशा शब्दांत विनने दीपिकाची स्तूती केली. ही इतकी स्तूती ऐकून दीपिका विनवर भाळणार नाही ते नवल. मग काय, दीपिकाने विनच्या गालाचे गोड चुंबन घेतले. शिवाय त्याला हिंदीत ‘आय लव्ह यू’ म्हणायलाही शिकवले. सो स्वीट आॅफ यू दीपिका!!