Join us

​प्रियंकासोबत स्टेज शेअर करायला दीपिकाचा नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 17:43 IST

गतवर्षी डिसेंबरमध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोपडा या दोघींच्या ‘बाजीराव मस्तानी’मधील एकत्र परफॉर्मन्सने सगळ्यांनाच घायाळ केले होते. या चित्रपटानंतर ...

गतवर्षी डिसेंबरमध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोपडा या दोघींच्या ‘बाजीराव मस्तानी’मधील एकत्र परफॉर्मन्सने सगळ्यांनाच घायाळ केले होते. या चित्रपटानंतर प्रियंका व दीपिका दोघीही आपआपल्या हॉलीवूड प्रोजेक्टमध्ये बिझी झाल्यात. मात्र यानंतर दोघींमध्ये अप्रत्यक्ष युद्ध सुरु झालेय. अर्थात आयफा अवार्डमध्ये प्रियंका व दीपिका दोघींही एकत्र स्टेजवर दिसल्या. केवळ दिसल्याच नाही तर एकमेकींची गळाभेट घेतानाही दिसल्या. यावरून दोघींमध्ये सर्वकाही आॅलवेल असल्याचेच संकेत गेले. पण....  पण असे नाहीय. दोघींमध्येही सगळे काही आॅलवेल नाही, असे आम्हाला समजलेयं. हो, एका आतल्या बातमीनुसार आयफा अवार्डमध्ये दीपिकाने प्रियंकासोबत स्टेज शेअर करायला नकार दिला. हो..दीपिका व प्रियंका दोघींनी ‘पिंगा ग..पोरी पिंगा..’वर एकत्र परफॉर्मन्स करावा, अशी आयोजकांची इच्छा होती. प्रियंका यासाठी तयारही होती. पण दीपिकाने म्हणे यास नकार दिला. आता या नकारामागचे कारण तुम्ही जाणताच..पीसी व डिप्पीने आयफाच्या स्टेजवर एकमेकींची गळाभेट घेतली असली तरी यातही त्या एकमेकींपासून अंतर राखूनच दिसल्या. यामागचे मुख्य कारण म्हणजे असुरक्षितता. प्रियंका हे स्पेनमधील सुपरिचित नाव आहे. प्रियंकाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला अमेरिकन शो ‘क्वॉन्टिको’चे दुसरे सीझन येथे रिलीज झाले आहे. याऊलट दीपिका हॉलिवूडमध्ये प्रियंकापेक्षा काहीशी ज्युनिअर आहे. त्याचमुळे प्रियंकासोबत डान्स केल्याने प्रियंका पुन्हा अधिक प्रकाशझोतात येईल, असे कदाचित दीपिकाला वाटले आणि त्यामुळेच तिने नकार दिला. आहे ना गंमत!