Join us

दीपिका पादुकोणने सांगितली मनातील गोष्ट; ‘या’ स्टारला म्हटले इंडस्ट्रीतील बेस्ट किसर, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 19:37 IST

सध्या दीपिका पादुकोण तिच्या ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर तिचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रचंड वादग्रस्त ठरत असलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी, त्यास विरोध कायम आहे. असो, आज आम्ही चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या दीपिकाबद्दलचा एक किस्सा सांगणार आहोत. वास्तविक दीपिका रणवीर सिंगसोबतच्या नातेसंबंधांवरून नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच हे दोघे साखरपुडा करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघांनी साखरपुडा केला की नाही? हा प्रश्न अजूनही त्यांच्या चाहत्यांच्या मनात आहे. परंतु दीपिकाने आता यावर खुलासा केला असून, बॉलिवूडमधील बेस्ट किसर कोण? हेदेखील सांगितले आहे. दीपिकाने नेहा धूपियाच्या ‘बीएफएफ विद वोग’ या शोमध्ये आपल्या मनातील गोेष्टी बिनधास्तपणे सांगितल्या. सध्या याबाबतचा तिचा एक व्हिडीओ रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये नेहा तिला इंडस्ट्रीतील बेस्ट किसर कोण? असे विचारताना दिसत आहे. नेहाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिकाही अतिशय बिनधास्तपणे रणवीर सिंगच इंडस्ट्रीतील बेस्ट किसर असल्याचे सांगताना दिसते. पुढे दीपिकाच्या हातातील अंगठी बघून नेहाने तिला साखरपुड्याविषयी विचारले असता ती त्यास स्पष्ट शब्दात नकार देते. तर दीपिकासोबत असलेली तिची बहीण अनीषा म्हणते की, लोकांमध्ये अशाप्रकारची चर्चा गेल्या चर्चा वर्षांपासून रंगत आहे. व्हिडीओमध्ये दीपिका ‘पद्मावत’ वादावरही बोलताना दिसते. दरम्यान, दीपिका, रणवीरचा ‘पद्मावत’ रिलीज झाला असून, त्यास विरोधाची धार अजूनही कायम आहे. कारण अतिशय बंदोबस्तात चित्रपट दाखविला जात आहे. परंतु अशाही स्थितीत चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.