Join us  

Video : अरे मॅडमजी रूकिए, मैं...!  फोटोग्राफर्सच्या जाळ्यातून शिताफीने निसटली दीपिका पादुकोण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 5:42 PM

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण जिथे जाईल तिथे कॅमेरे तिच्या मागावर असतात. सध्या दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ठळक मुद्देदीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायवे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.  

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण जिथे जाईल तिथे कॅमेरे तिच्या मागावर असतात.  सध्या दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात दीपिका फोटोग्राफर्सची बोलण्यावर हसताना दिसतेय.सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दीपिका तिच्या बहिणीसोबत दिसतेय. तर दीपिका व तिची बहीण अनीशा यांनी काल डिनर डेट एन्जॉय केली. दोघी बहिणी जेवण करून हॉटेलबाहेर येताच, फोटोग्राफर्सनी त्यांना घेरले. फोटोग्राफर्स दीपिकाला पोज देण्याची विनंती करू लागतात. पण दीपिका हळूहळू गर्दीतून आपल्या कारकडे जाऊ लागते. इतक्यात एका फोटोग्राफरचा आवाज तिच्या कानी पडतो. ‘अरे मॅडमजी रूकिए, मैं नया आया हूं....,’ असे हा फोटोग्राफर म्हणतो. यावर दीपिका हसू लागते आणि कारमध्ये जाऊन बसते.

कारण फोटोग्राफरची ही ट्रिक तिच्या लक्षात आली असते. अनेक फोटोग्राफर्स स्वत:ला नवा आहे सांगत, सेलिब्रिटींचे एक्सक्लुसिव्ह फोटो घेतात. दीपिका ब-याच वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. अशात फोटोग्राफर्सची ही ट्रिक तिच्या लक्षात आली नसेल तर नवल.

या व्हिडीओत दीपिका ट्राऊजर व शर्टवर ओव्हर साईज कोटमध्ये दिसतेय. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर वर्कफ्रंटबद्दल सांगायचे दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायवे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.  यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने हातावेगळा केला आहे. रणवीरच्या ‘83’ या सिनेमातही तिची छोटीशी भूमिका असणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण