Join us  

दीपिका पादुकोणने शेअर केले रणबीरसोबतचे ‘ते’ खास फोटो; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:56 PM

ते दोघे एकेकाळी रिलेशनशिपमध्येही होते. त्यांची ती केमिस्ट्री आपण पडद्यावर अनुभवायचो. दीपिका नेहमीच रणबीरसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असते.

बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पादुकोण आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूर यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावते. ते दोघे एकेकाळी रिलेशनशिपमध्येही होते. त्यांची ती केमिस्ट्री आपण पडद्यावर अनुभवायचो. दीपिका नेहमीच रणबीरसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असते. आज पुन्हा तिला त्याची आठवण आली. आता तुम्ही म्हणाल की, काय आहे कारण? तर होय, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, दीपिका आणि रणबीरने एकत्र काम केलेला चित्रपट म्हणजे ‘ये जवानी हैं दिवानी’. या चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाली असून दीपिका नॉस्टॅल्जिक झाली आहे. त्यामुळे तिने रणबीरसोबतचे पहिले फोटोसेशन, डायलॉग आणि फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केले आहे. 

ये जवानी हैं दिवानी या चित्रपटातील दीपिका-रणबीरची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. आजही त्यांची ती केमिस्ट्री प्रेक्षक मिस करतात. या चित्रपटानंतर प्रेक्षकांना ही जोडी नेहमीच पडद्यावर बघावी वाटायची. तसेच नाते दीपिका-रणबीरमध्ये वाढत असल्याने ते दोघेही चाहत्यांसमोर एक कपल म्हणूनच समोर येऊ लागले. पण, त्यामुळेच दीपिका आता नॉस्टॅल्जिक झालीय. तिने या चित्रपटातील काही डायलॉग्ज आणि फोटोंसोबत ती पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आलीय. तिने या चित्रपटातील एक डायलॉग शेअर केला आहे. ‘यादें मिठाई के डिब्बे की तरह होती हैं... एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे- नैना तलवार’ चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाल्याने ती रणबीरसोबतची तिची केमिस्ट्री आठवत आहे. 

‘ये जवानी हैं दिवानी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा रणबीर-दीपिकाची जोडी चांगलीच चर्चेत आली. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाला चाहत्यांनी पसंती दर्शवली. तसेच या जोडीलाही अक्षरश: डोक्यावर घेतले. दीपिकासोबतच करण जोहरनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणबीर कपूर