Join us

दीपिका पादुकोणचा खुलासा; ‘या’ अभिनेत्रीला आपल्या लग्नात बोलाविणार नसल्याचे केले स्पष्ट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 20:00 IST

दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अशा दोन अभिनेत्री आहेत, ज्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी एकप्रकारची पर्वणी असते. मात्र ...

दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अशा दोन अभिनेत्री आहेत, ज्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी एकप्रकारची पर्वणी असते. मात्र त्याचबरोबर ही बाबदेखील सगळ्यांना माहिती आहे की, या दोघींनी कधीच एकमेकींना पसंत केले नाही. यामागील कारण काय हेदेखील सगळ्यांनाच माहिती आहे. होय, रणबीर कपूरमुळेच या दोघींमध्ये दुश्मनी झाली जी अजूनही कायम आहे. जेव्हा रणबीर कपूरने दीपिकाला सोडून कॅटरिनाला डेट करण्यास सुरुवात केली तेव्हापासून या दोघींमध्ये कॅटफाइट सुरू झाली. दोघींमधील वाद एवढा विकोपाला गेला की, आज त्या एकमेकींचे तोंड बघणेही पसंत करीत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की, आता हा विषय सांगण्यामागचे नेमके कारण काय? तर दीपिकाने नुकतेच नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये आपल्या बहिणीसोबत हजेरी लावली होती. या चॅट शोदरम्यान जेव्हा नेहाने दीपिकाला ‘तू तुझ्या लग्नात कॅटरिनाला बोलाविणार काय?’ असा प्रश्न विचारला तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता नाही असे उत्तर दिले. २०११ मध्ये रणबीर कपूरने कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला होता की, त्याने नकळतपणे दीपिकासोबत नाते तोडले. ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक असल्याचे त्याने जाहीरपणे मान्य केले होते. खरं तर जेव्हा रणबीर दीपिकासोबत नात्यात होता, तेव्हा त्याने कॅटरिनासोबत जवळिकता वाढविली होती. मात्र याबाबतचे शल्य आजही त्याच्या मनात आहे. असो, सध्या दीपिका आणि रणबीरच्या नात्यात पहिल्यासारखा दुरावा नाही. ते आज एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र कॅट आणि दीपिकाची दुश्मनी मात्र दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे.