Join us  

दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:46 AM

होय, मोठ्या पडद्यावर येणा-या ‘महाभारत’ सीरिजमध्ये द्रौपदीची भूमिका साकारण्यास दीपिकाने होकार दिला आहे.

ठळक मुद्देसध्या दीपिका ‘छपाक’ आणि ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे.

हिंदी सिनेमाची नंबर 1 ची हिरोईन दीपिका पादुकोण हिने एक मोठा खुलासा केला आहे. होय, मोठ्या पडद्यावर येणा-या ‘महाभारत’ सीरिजमध्ये द्रौपदीची भूमिका साकारण्यास दीपिकाने होकार दिला आहे.  

 दीपिका आणि निर्माता मधू मंटेना मिळून महाभारतावर आधारित चित्रपट मालिकांची निर्मिती करत आहेत. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, द्रौपदीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटांची कथा लिहिली जाणार आहे. याच एका अटीवर दीपिकाने द्रौपदीचे पात्र साकारण्यास होकार दिला आहे.

महाभारतावर आधारित हा चित्रपट दोन वा अधिक भागात प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे अपेक्षित आहे. 

‘मीड डे’ या वृत्तपत्राशी बोलताना दीपिकाने ही माहिती दिली. महाभारत या महाकाव्यातून आपल्याला आयुष्य जगण्याचा धडा  मिळाला. या चित्रपटाचा भाग होण्यास मी उत्सुक आहे, असे दीपिका म्हणाली. यासंदर्भात मधू मंटेना म्हणाले की, आपण सर्वांनी महाभारत अनेका पाहिले, वाढले वा ऐकले आहे. पण महाभारतावर आधारित आमचा चित्रपट द्रौपदी या पात्राभोवती फिरणारा असेल. दीपिका एक गुणी अभिनेत्री आहे. अभिनयाच्या जोरावर चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे कसब तिच्यात आहे. ती नसती तर हा चित्रपट बनूच शकला नसता.  सध्या दीपिका ‘छपाक’ आणि ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे.

 

टॅग्स :दीपिका पादुकोण