Join us  

आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट? वाचा, संजय लीला भन्साळींनी काय दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 5:56 PM

Deepika Padukone or Alia Bhatt? भन्साळींनी दीपिका व आलिया या दोघींसोबतही काम केलंय. आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत भन्साळींना विचारण्यात आला आणि या प्रश्नावर भन्साळींनी चकीत करणारं उत्तर दिलं.

संजय लीला भन्साळींचा (Sanjay Leela Bhansali) ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आलिया भट (Alia Bhat) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. गंगूबाईची भूमिका तिने साकारलीये आणि तिने साकारलेल्या या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. अर्थात काहींच्या मतं जरा वेगळं आहे. या चित्रपटासाठी आलियाची निवड करून भन्साळी चुकलेच. तिच्याऐवजी भन्साळींनी या चित्रपटात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) , प्रियंका चोप्रा किंवा विद्या बालन यापैकी एकीला घ्यायला हवं होतं, असं अनेकांचं मत पडलं. पण भन्साळींचं म्हणाल तर आलिया या चित्रपटासाठी अगदी योग्य होती आणि आहे, असं त्यांचं ठाम मत आहे.

भन्साळींनी दीपिका व आलिया या दोघींसोबतही काम केलंय. दीपिका तर भन्साळींची आवडती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण तरिही आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत भन्साळींना विचारण्यात आला आणि या प्रश्नावर भन्साळींनी चकीत करणारं उत्तर दिलं.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, दीपिका व आलिया दोघीही दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. उंचीपासून दोघींचा स्वभाव, आवाज, देहबोली सगळंच वेगळं आहे. दीपिका सुंदर व प्रतिभावान अभिनेत्री आहे. तशीच आलिया सुद्धा माझ्यासाठी सुंदर आणि प्रतिभावान हिरोईन आहे. या दोघींपैकी एक निवडण्याची वेळ आलीच तर बाजीराव मस्तानी बनवायची असेल तर मी दीपिकाची निवड करेल आणि गंगूबाईसाठी आलियाच निवडेल. प्रत्येकाची एक शक्ती असते. तुम्ही चुकीच्या कलाकाराला चुकीची भूमिका देऊ शकत नाही. दीपिका व आलियाची मी केलेली निवड ‘योग्य निवडीवर’ आधारित होती. कोण बेस्ट याचा काहीही संबंध नव्हता. चित्रपटाचा आशय लक्षात घेऊन त्या त्या चित्रपटासाठी मी दोघींची निवड केली. गंगूबाईच्या रोलसाठी आलियाने जे काही केलं, ते फक्त तिच करू शकते आणि मस्तानीच्या भूमिकेत दीपिकाने जे केलं ते केवळ तिचं करू शकते. 

टॅग्स :आलिया भटदीपिका पादुकोणसंजय लीला भन्साळी