Join us

‘पद्मावत’च्या यशामुळे हरकून गेली दीपिका पादुकोण, राजस्थानी थाळीचा आस्वाद घेत केले सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:25 IST

देशभरात प्रचंड विरोधानंतरही प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ने तीनच दिवसांत कमाईचा उच्चांक गाठल्याने, चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली दीपिका पादुकोण चांगलीच हरकून ...

देशभरात प्रचंड विरोधानंतरही प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ने तीनच दिवसांत कमाईचा उच्चांक गाठल्याने, चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली दीपिका पादुकोण चांगलीच हरकून गेली आहे. आतापर्यंत चित्रपटाने संजय लीला भन्साळी यांच्याच ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या बरोबरीने कमाई केली आहे. वास्तविक बºयाचशा राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला नाही, मात्र अशातही ज्या पद्धतीने चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपला करिष्मा दाखवित आहे, त्यावरून आगामी काळात हा आकडा दोनशे कोटींच्यावर जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, चारच दिवसांमध्ये चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविल्याने, दीपिका चांगलीच हरकून गेली आहे. विशेष म्हणजे तिने चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशनही केले आहे. गेल्या रात्री दीपिका जुहूमधील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. याठिकाणी तिने राजस्थानी थाळीचा आस्वाद घेत सेलिब्रेशन केले. यावेळी दीपिका खूपच गॉर्जियस लूकमध्ये दिसत होती. यावेळी दीपिकाने ग्रीन कलरचा शरारा आणि लॉन्ग कुर्ता परिधान केला होता. दीपिकाचा हा आउटफिट सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केला होता. राजस्थानी थाळीचा स्वाद घेताना दीपिका खूपच खूश असल्याचे दिसत होती. यावेळी तिने तिच्या चाहत्यांबरोबर सेल्फीही घेतली. शिवाय मीडियालाही तिने पोझ दिल्या. या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला सुरुवातीपासूनच करणी सेना व इतर राजपूत संघटनांकडून विरोध केला जात होता. मात्र अशाही स्थितीत हा चित्रपट गेल्या २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. मात्र विरोधाचा सूर अजूनही कायम आहे.