Join us  

दीपिका पादुकोण दिसणार मॅडम तुसाद म्युझियम मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:17 PM

दीपिका आज बॉलिवूड चित्रपटातील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. दीपिकाचा स्टॅच्यू आता मॅडम तुसाद म्युझियम मध्ये दिसणार असून सध्या दीपिका यासाठी लंडनमध्ये आहे.

मॅडम तुसाद म्युझियम मध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय, करिना कपूर, कतरिना कैफ, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, हृतिक रोशन यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे स्टॅच्यू आहेत. आता या स्टॅच्यूमध्ये आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या स्टॅच्युयची भर पडणार आहे. दीपिका पादुकोणने ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे तिच्या चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. तिने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना केली जाते. तिने आजवर पद्मावत, बाजीराव मस्तानी, राम लीला, ये जवानी है दिवानी, पिकू यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहे. एवढेच नव्हे तर हॉलिवूडच्या एक्सएक्सएक्स या अॅक्शनपटात देखील तिने काम केले आहे. दीपिका आज बॉलिवूड चित्रपटातील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. दीपिकाचा स्टॅच्यू आता मॅडम तुसाद म्युझियम मध्ये दिसणार असून सध्या दीपिका यासाठी लंडनमध्ये आहे. स्टॅच्यु बनवण्यासाठी लंडनमध्ये तिचे नुकतेच माप देखील घेण्यात आले आहे. दीपिका पादुकोणचापद्मावत हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपट तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ३०० करोड हून अधिक पैसा या चित्रपटाने कमावला होता. एवढेच नव्हे तर या वर्षीच्या टाइम्स मासिकाच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत देखील पहिल्या शंभरमध्ये तिचे नाव आहे. आज बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त पैसे घेणारी ती अभिनेत्री मानली जाते. दीपिकाने आजवर अनेक स्त्री केंद्रित चित्रपट केले असून तिच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांची लाडकी दीपिका आता लंडनमधील मॅडम तुसाद म्युझियम मध्ये कोणत्या वेशभूषेत दिसणार याबाबत म्युझियमकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण दीपिका तिच्या कोणत्या चित्रपटातील भूमिकेत दिसणार की खऱ्या आयुष्यातील दीपिकाची छबी प्रेक्षकांना पाहायला मिळणार याची उत्सुकता तिच्या फॅन्सना लागली आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणपद्मावतमॅडम तुसाद संग्रहालय