दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या ‘या’ फोटोने सोशल मीडियावर खळबळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 22:45 IST
कदाचित तुम्हाला आठवत असेल की, काहीकाळापूर्वीच रणवीर सिंगने म्हटले होते की, दीपिका पादुकोण सर्वात चांगली किसर आहे. हा खुलासा ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या ‘या’ फोटोने सोशल मीडियावर खळबळ !
कदाचित तुम्हाला आठवत असेल की, काहीकाळापूर्वीच रणवीर सिंगने म्हटले होते की, दीपिका पादुकोण सर्वात चांगली किसर आहे. हा खुलासा त्याने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये केला होता. रणवीरने म्हटले होते की, ‘मला असे वाटते की, दीपिका सर्वात चांगली किसर आहे. तुम्ही ‘अंग लगा दे रे, मुझे रंग लगा दे रे हे’ गाणं ऐकले आहे काय? या गाण्याची त्याने यावेळी आठवण करून दिली होती. मात्र रणवीरच्या या खुलाशाच्या काहीकाळानंतरच सोशल मीडियावर रणवीर अन् दीपिकाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. दोघांच्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून, सर्वत्र या दोघांची सध्या चर्चा रंगत आहे. वास्तविक रणवीर, दीपिकाचा हा फोटो त्यांच्या एका चाहत्याने शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही एकमेकांना किस करतानाच्या पोझिशनमध्ये दिसत आहेत. आमच्या माहितीनुसार दोघांचा हा फोटो वॉग फोटोशूटदरम्यानचा आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच, त्याबाबत सर्वत्र चर्चा रंगत आहे. खरं तर हा फोटो शेअर करणाºया दोघांच्या त्या चाहत्याचे कौतुकच करायला हवे. कारण मोठ्या मुश्किलीने त्याने हा फोटो मिळविला असेल यात शंका नाही. हा फोटो सध्या सोशल मीडियावर ‘दीपवीर’ या हॅशटॅगने पोस्ट केला जात आहे. रणबीर कपूरबरोबरचे नाते तुटल्यानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यात प्रेम बहरले होते. दोघांमधील केमिस्ट्री पाहता यांच्यातील नाते बराच काळ टिकेल असेच काहीसे दिसत होते. मधल्या काळात तर दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविले. शिवाय हे दोघे ‘पद्मावती’ या चित्रपटातही एकत्र झळकणार आहेत. मात्र दोघांमधील नाते आता संपुष्टात आल्याने ही जोडी तुटली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी जरी निराशाजनक असली तरी, दोघांचा हा फोटो बघून त्यांनी पुन्हा एकत्र यावे, असेच त्यांच्या चाहत्यांना वाटत असावे.