युरोपियन म्युझिक अॅवॉर्डला जाणार दीपिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 13:03 IST
दीपिका पदुाकोन आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी म्हणून आपला दबदबा वाढवत आहे. ‘ट्रिपल एक्स’ स्टार रविवारी (दि. ०६) होणाऱ्या युरोपियन म्युझिक ...
युरोपियन म्युझिक अॅवॉर्डला जाणार दीपिका
दीपिका पदुाकोन आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी म्हणून आपला दबदबा वाढवत आहे. ‘ट्रिपल एक्स’ स्टार रविवारी (दि. ०६) होणाऱ्या युरोपियन म्युझिक अॅवॉर्ड (इएमए) सोहळ्यामध्ये हजर राहणार आहे. स्वत: डिप्पीने माहिती माहिती दिली की, ती नेदरलँडमधील राटरडॅम शहरात होणाऱ्या या संगीत पुरस्कार सोहळ्याला जाणार आहे.पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून हॉलीवूड पदार्पण करणारी दीपिका आतापासूनच जागतिक पातळीवर आपली उपस्थिती जाणवू देत आहे. ती म्हणाली की, ‘युरोपियन म्युझिक अॅवॉर्ड २०१६’ ला जाण्यास मी खूप एक्सायटेड आहे. सगळ्या दिग्गज संगीतकारांसोबत राहण्याची संधी मला मिळणार असल्यामुळे मी जाम खुश आहे.’जगभरातील संगीतकार-गायकांचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात करण्यात येतो. म्युझिक इंडस्ट्रीमधील अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार असून जगभरात तो पाहिला जातो. मोठ-मोठे कलाकार या कार्यक्रमात परफॉर्म करतात. बरं दीपिका केवळ उपस्थित राहणार नाही तर तिच्या हस्ते एक पुरस्कार प्रदानसुद्धा केला जाणार आहे. कोण बाजी मारणार? : जस्टीन बीबर आणि बियॉन्से ‘ट्रिपल एक्स’ स्टार : दीपिका पदुाकोनयंदाच्या ‘इएमए’मध्ये जस्टीन बीबर आणि बियॉन्से पाच नामंकनासह आघाडीवर असून अॅडेलेला चार प्रकारची नॉमिनेशन्स आहेत. तसेच रिहाना, ड्रेक, कान्ये वेस्ट, अरियाना ग्रँडे आणि द विकेंड हेसुद्धा विविध पुरस्कारांसाठी नामांकित आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या या कार्यक्रमात दीपिकाचे असणे तिच्या लोकप्रियतेसाठी खूप फायद्याचे ठरणार यात शंका नाही.अॅफ्रॉजॅक आणि बु्रनो मार्ससारख्या लिजेंडच्या उपस्थित मी स्वत:ला भाग्यवान समजेल, अशी तिची प्रतिक्रिया आहे. ग्रेट गोर्इंग दीपिका! इकडे भारतात तिच्या ‘पद्मावती’ चित्रपटाची शूटींग सुरू झाली आहे. रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर या सिनेमात ती राणाी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार.