Join us

​अन् दीपिका अन् कॅटरिनातील भांडण अखेर मिटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 13:24 IST

दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यातील ‘कोल्ड वॉर’च्या चर्चा मध्यंतरी बरीच गाजली. डिप्पी आणि कॅट एकमेकींचा चेहरा पाहणेही पसंत ...

दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यातील ‘कोल्ड वॉर’च्या चर्चा मध्यंतरी बरीच गाजली. डिप्पी आणि कॅट एकमेकींचा चेहरा पाहणेही पसंत करत नाहीत, इथपर्यंत बोलले गेले. पण कदाचित हा भूतकाळ झाला. होय, दीपिका आणि कॅटरिना यांच्यातील मतभेद कदाचित आता संपलेत. दिग्दर्शक आनंद एल राय यांनी ही कमाल करून दाखवलीय. राय यांनी केवळ दीपिका आणि कॅट यांच्यातील दुरावा कमी केला नाही तर कायमचा घालवला,असेच म्हणावे लागेल. राय यांच्या आगामी चित्रपटात कॅटरिना व दीपिका दोघीही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. निश्चितपणे ही सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आहे.आनंद एल राय यांच्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण या चित्रपटाची चर्चा मात्र ब-याच दिवसांपासून सुरु झाली होती. या चित्रपटासाठी शाहरूख खानचे नाव फायनल झाले होते.  फिमेल लीडबाबत मात्र वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या. मध्यंतरी या चित्रपटासाठी आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांच्या नावांचीही चर्चा होती. नंतर या चित्रपटात कॅटरिना असणार, अशी बातमी आली. यानंतर दीपिकासोबत स्क्रीन शेअर करायची नाही, म्हणून कॅटरिनाने हा चित्रपट नाकारल्याची खबर आली. पण आनंद एन राय यांना चित्रपटात कॅटरिना व दीपिका दोघीही हव्या होत्या. अखेर त्यांना यात यशही आले. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, राय यांच्या मनधरणीनंतर कॅट व डिप्पी दोघीही एकत्र काम करण्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच चित्रपटाचे शूटींग सुुरु होणार आहे. शाहरूख खान या चित्रपटासाठी बराच उत्सूक आहे. कारण या चित्रपटात तो पहिल्यांदा एका ठेंगण्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.