दिपीकाचे ‘मेंटल हेल्थ कॅम्पेन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 09:15 IST
दीपिका पदुकोन ही गेल्यावर्षीपासून तिच्या मानसिक स्वास्थ्याविषयी बोलत आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे किती गरजेचे आहे ...
दिपीकाचे ‘मेंटल हेल्थ कॅम्पेन’
दीपिका पदुकोन ही गेल्यावर्षीपासून तिच्या मानसिक स्वास्थ्याविषयी बोलत आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे किती गरजेचे आहे यासाठी ती जनजागृती कॅम्प घेत आहे. ‘यू आर नॉट अलोन’ हा तिचा मेंटल हेल्थ कॅम्पेन आहे.ती म्हणते,‘ मागील वर्षी मी नैराश्यातून मुक्ती मिळवण्यासाठी मेंटल हेल्थ कॅम्पेनविषयी बोलले होते. मी लोकांना नैराश्यात पाहू शकत नाही ज्यातून मी आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना यातून बाहेर काढण्यासाठी हा कॅम्प खुपच महत्त्वाचा वाटतो. ’दिपीकाच्या स्वत:च्या बेंगळूरू येथील सोफिआ हायस्कूल येथून याची सुरूवात होणार आहे. २०० शाळांना या कॅम्पमधून जावे लागणार आहे. भावनाशिल आणि मानसिक हेल्थ आजार शाळांपासूनच सुरू होतात. शाळांना काऊंसेलिंग संस्थांना या माध्यमातून भेटवू शकता येते.