Join us  

पत्रकार संदीप पाल यांचे दिग्दर्शनात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:00 PM

संदीप पल वेब पोर्टलवरील प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये शाहरूख खान, पंकज कपूर, कंगना रानौत, आमीर खान, अनुपम खेर, झोया अख्तर, अक्षय खन्ना, इमरान हाश्मी, राजकुमार राव व इतर कलाकारांच्या मुलाखती केल्या आहेत

संदीप पल वेब पोर्टलवरील प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये शाहरूख खान, पंकज कपूर, कंगना रानौत, आमीर खान, अनुपम खेर, झोया अख्तर, अक्षय खन्ना, इमरान हाश्मी, राजकुमार राव व इतर कलाकारांच्या मुलाखती केल्या आहेत आणि आता लवकरच ते दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

संदीप यांच्या आई वडिलांना त्यांनी विज्ञान क्षेत्रात करियर करावे, अशी इच्छा होती. मात्र त्यांना विज्ञानात अजिबात रुची नव्हती. त्यांना कलेची खूप आवड होती. त्यांचे भाषा, साहित्यावर प्रेम होते. चित्रपट पाहायला आवडायचे आणि कलेबद्दल जाणून घ्यायला आवडायचे. ते उत्कृष्ट गायकदेखील आहेत. त्यांना मीडिया क्षेत्रात करियर करण्यासाठी आई वडिलांना खूप मनवावे लागले आणि त्यांनी मास कम्युनिकेशनसाठी सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला.  संदीप पल यांनी ग्रॅज्युएशननंतर कोलकातामध्ये सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमधून फिल्म मेकिंगचे धडे गिरविले आणि मुंबईत येऊन चित्रपट निर्माता बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. झी एण्टरटेन्मेंट एण्टरप्राइझेस लिमिटेड सोबत प्रसारमाध्यमातील करियरला सुरूवात केली आणि हळूहळू पत्रकारितेत आपला जम बसविला. संदीप पल यांनी प्रसिद्ध मीडिया वेब पोर्टलमध्ये एण्टरटेन्मेंट कंटेट चीफ काम पाहिले आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण करायचा निर्णय घेतला आहे.संदीप पल यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत आपल्या चित्रपटाबद्दल चर्चा करायला सुरूवात केली आहे. या चित्रपटाची स्क्रीप्टिंग झालेली असून सध्या या चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ते कोणता चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, हे लवकरच समजेल.

टॅग्स :आमिर खान