Join us

​या प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्समुळे झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 17:23 IST

निशा नूर या अभिनेत्रीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. कल्याण अगथिगल, अय्यर द ग्रेट, टिक टिक टिक, चुवाप्पू ...

निशा नूर या अभिनेत्रीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. कल्याण अगथिगल, अय्यर द ग्रेट, टिक टिक टिक, चुवाप्पू नाडा, मिमिक एक्शन ५०० यांसारखे तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. अनेक चित्रपटातील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. निशाने तिच्या अभिनयाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिचे एक स्थान निर्माण केले होते. निशा दक्षिणेत इतकी लोकप्रिय होती की, कमल हासन, रजनिकांत यांसारखे कलाकार देखील तिच्यासोबत काम करायला उत्सुक होते. पण एवढी लोकप्रियता मिळून देखील निशाच्या आयुष्याचा शेवट खूपच वाईट झाला. निशाला एड्स झाला होता. त्यामुळे शेवटच्या क्षणी तिचे प्रचंड हाल झाले.निशा चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत होती. तिचे करियर खूपच चांगले सुरू होते. पण त्याच काळात तिची एका निर्मात्यासोबत ओळख झाली. या निर्मात्याने तिला फसवले आणि तिला वेश्या व्यवसायात ढकलले. एकदा या व्यवसायात पडल्यानंतर तिथून बाहेर पडणे निशासाठी खूप कठीण झाले होते. त्याचकाळात तिला एड्सची लागण झाली. निशाला एड्स झाला आहे हे कळताच इंडस्ट्रीतील लोक देखील तिच्यापासून दुरावले. तिला कामं मिळणे बंद झाली. त्यामुळे तिने देखील ही इंडस्ट्री सोडली आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून आयुष्य जगू लागली. निशाची नंतरच्या काळात अवस्था एवढी वाईट झाली होती की, तिला ओळखणे देखील कठीण झाले होते. तिच्या या वाईट काळात इंडस्ट्रीतील कोणीच तिला आधार दिला नाही. एवढेच काय तर तिला कोणी भेटायला देखील आले नाही. निशा प्रसिद्धीझातोत असताना तिच्याकडे प्रचंड पैसा होता. पण नंतरच्या काळात तिची आर्थिक परिस्थिती देखील बेताची झाली. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ती शेवटच्या काळात रस्त्यावर भीक मागताना दिसली. उपचार करण्यासाठी देखील तिच्याकडे पैसे नव्हते. एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार तर निशा नागोर दर्ग्याजवळ आढळली होती, त्यावेळी तिच्या शरीराला किडे लागले होते. निशा शेवटच्या क्षणी अतिशय वाईट परिस्थितीत होती.