Join us

'मोहंजोदडो'ची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:33 IST

अभिनेता हृतिक रोशन सध्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा आगामी चित्रपट 'मोहंजोदडो' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्याला माहीतच आहे की, ...

अभिनेता हृतिक रोशन सध्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा आगामी चित्रपट 'मोहंजोदडो' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्याला माहीतच आहे की, आशुतोष गोवारीकर जो चित्रपट बनवतो त्यात संपूर्ण स्किल्स पणाला लावतो.२0१६ ऑगस्ट मध्ये रिलीज करण्यात येणार्‍या या चित्रपटाविषयी खूपच चर्चा आणि उत्सुकता हृतिकच्या चाहत्यांमध्ये आहे. २६00 बी.सी. मधील लव्हस्टोरीवर चित्रपट आधारित आहे.पुढील वर्षाचा बिग बजेट चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. आशुतोष आणि हृतिक यांची जादू जोधा अक बर नंतर कशाप्रकारे पसरते हे लवकरच कळेल. हृतिक पूर्णपणे स्वत:ला झोकून देऊन या शूटिंगमध्ये काम करतोय.मगरीसोबत २0 फुटी अँक्शन सीन, वाघांसोबत फाईटिंग असे स्टंट यात आहेत. बिग बजेट चित्रपटासोबतच ए.आर.रहेमानचे संगीत ऐकायला मिळणार आहे. आशुतोष गोवारीकर यांना चित्रपटाकडून खुपच अपेक्षा आहेत.