Join us  

मेसमधून जेवण आलं, ‘मन्नत’वरून कपडे..., NCB कस्टडीत आर्यन खानने असे घालवले 72 तास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 1:04 PM

Aryan Khan Arrest updates: गेल्या 72 तासांपासून शाहरूख खानचा लाडका लेक आर्यन खान एनसीबीच्या कस्टडीत आहे. आता पुन्हा 3 दिवसांची कस्टडी मिळाल्याने एनसीबी अधिकारी आर्यनची कसून चौकशी करत आहेत.

ठळक मुद्दे आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्या बुटांमध्ये चरस लपवल्याचं निदर्शनास आलं आहे.

गेल्या 72 तासांपासून शाहरूख खानचा लाडका लेक आर्यन खान (Aryan Khan ) एनसीबीच्या कस्टडीत आहे. (Aryan Khan Arrest updates: )आता पुन्हा 3 दिवसांची कस्टडी मिळाल्याने एनसीबी अधिकारी आर्यनची कसून चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडतोय. गेल्या 72 तासांत आर्यनला फक्त एकदा वडिलांसोबत म्हणजेच शाहरूखसोबत बोलण्याची संधी दिली गेली. ती सुद्धा फक्त दोन मिनिटं.सूत्रांचे मानाल तर, एनसीबी कस्टडी वाढल्यामुळे आर्यन अस्वस्थ आहे. पण एनसीबीच्या चौकशीस तो पूर्णपणे सहकार्य करतोय. अधिका-यांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तरं देतोय. यादरम्यान एनसीबी अधिका-यांनी आर्यन व त्याच्यासोबत अटक झालेला त्याचा मित्र अरबाज मर्चंट या दोघांना समोरासमोर बसवूनही चौकशी केली. आर्यनला बलार्ड इस्टेटमधील एनसीबी कार्यालयाच्या दुस-या माळ्यावर ठेवण्यात आला आहे. (Mumbai Cruise Drugs Case)

 एनसीबीच्या कोठडीत आर्यनवर कधी नव्हे ते मेसचं जेवण खाण्याची वेळ आली आहे. त्याला मेसचं जेवण दिलं जातंय. घरून काही कपडे पाठवण्यात आले आहेत. ते वापरण्याची परवानगी एनसीबीने दिली आहे. नियमानुसार, घरचं जेवण उपलब्ध करून देण्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज असते. आर्यनकडून अद्याप तरी ही परवानगी घेतली गेलेली नाही. मात्र कोर्टात त्याने नेजल ड्रॉपची मागणी केली होती. तो त्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान आर्यनने अनेक खुलासे केले आहेत. स्वत:चा 4 पानांचा जबाबही लिहिला आहे. माझे वडिल प्रचंड बिझी असतात. इतके की अनेकदा त्यांना भेटण्यासाठी आम्हाला त्यांची वेळ घ्यावी लागते, असेही त्याने चौकशीदरम्यान सांगितलं.आर्यनवर केवळ एनडीपीएसच्या कलम २७ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला 20 हजार रुपये दंड आणि 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असं एनसीबीच्या एका अधिकाºयाने सांगितलं आहे. आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्या बुटांमध्ये चरस लपवल्याचं निदर्शनास आलं आहे.

टॅग्स :आर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोशाहरुख खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी