Join us  

Coronavirus: Shocking! कनिका कपूरच्या संपर्कात आले होते 162 लोक, 63 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 3:01 PM

मीडिया रिपोर्ट्सनुसार कनिका कपूरसोबत पार्टीत उपस्थित असलेल्या 162 लोकांपैकी 63 लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. तिच्या बेजबाबदारपणासाठी तिला ट्रोल केले जात आहे. याचसोबत तिच्याबाबत कित्येक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.लंडनवरून परतल्यानंतर तिने काही पार्टी अटेंड केल्या होत्या. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या बाकीच्या लोकांचाही जीव टांगणीला लागला आहे. तिच्यासोबत या पार्टीमध्ये राजकीय नेते, कलाकार उपस्थित होते. यामध्ये जवळपास 162 लोकांचा समावेश आहे. यादरम्यान आता कनिका कपूरच्या पाहुण्यांबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.नुकत्याच मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार कनिका कपूरसोबत त्या पार्टीत उपस्थित असलेल्या 162 लोकांपैकीा 120 ते 130 लोकांच्या सॅम्पल टेस्टसाठी घेण्यात आले होते. त्यातील 63 लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 63 लोकांच्या सॅम्पलमध्ये कोरोना व्हायरस आढळला नाही. हे ऐकून हैराण व्हाल की 162 लोकांपैकी 32 जण फक्त कानपूरचे होते. कनिका कपूर या लोकांना भेटण्यासाठी कानपूरला गेली होती. कनिका कपूरच्या या वर्तुणूकीमुळे तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तेच लोक आता तिच्यावर खूप वैतागले आहेत.

असेही सांगितले जात आहे की कनिका कपूर त्याच हॉटेलमध्ये थांबली होती. जिथे साऊथ आफ्रिकाच्या टीमची थांबवण्याची व्यवस्था केली होती. तसे आतापर्यंत बीसीसीआयने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

कनिकाचा पहिले गाणे ‘जुगनी जी’ 2012 मध्ये रिलीज झाले. हे गाणे जबरदस्त लोकप्रिय झाले. पण तिच्या करिअरला ‘बेबी डॉल’ या गाण्याने एका नव्या उंचीवर नेले. या गाण्यामुळे कनिकाला बॉलिवूडची मोठी प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखले जाऊ लागले. ती एका रात्रीत स्टार झाली. ‘रागिनी एमएमएस 2’चे बेबी डॉल हे गाणे सनी लिओनीवर चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे तुफान व्हायरल झाले होते. या गाण्यासाठी कनिकाला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या यशानंतर कनिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या