Join us  

CoronaVirus: पुन्हा एकदा थलायवा कलाकारांच्या मदतीसाठी धावला, 1000 कलाकारांना देणार किराणा सामान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 5:20 PM

कोरोना संकटामुळे बॉलिवूडप्रमाणेच साऊथ इंडस्ट्रीही ठप्प आहे.

कोरोनामुळे अख्खे जग जागच्या जागी थांबलेय. देशातही परिस्थिती वेगळी नाही़ घरातून बाहेर पडू नका, स्वत:सोबत इतरांचा जीव वाचवा, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहेत. समाजाच्या भल्यासाठी किंबहुना कोरोनाचे संकट परतून लावण्यासाठी आपण सर्वांनी घरात राहणे आपले कर्तव्य आहे. पण सगळीकडे लॉकडाऊन असताना तळहातावर पोट असणा-यांचे मात्र हाल आहेत. दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या घराचा गाडा चालतो, त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. आपल्या फिल्म इंडस्ट्रीतही असे अनेकजण आहेत.

इंडस्ट्रीतील अनेक वर्कर्स सध्या काम बंद असल्याने घरी बसून आहेत. प्रोड्सर्स गिल्ड, अनेक फिल्ममेकर्स या वर्कर्सची मदत करत आहेत. आता थलायवा रजनीकांत यांनी फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साऊथ इंडियाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्यानंतर आता रजनीकांत नदीगर संगम येथील कलाकारांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रजनीकांत नदीगर संगमच्या सुमारे हजारो कलाकारांना किराणा सामान उपलब्ध करून देणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे शूटिंग जवळजवळ पूर्णपणे थांबले आहे. अशा परिस्थितीत दक्षिण भारतीय आर्टिस्ट असोसिएशनच्या (नदीगर संगम) अनेक कलाकारांना दैनंदिन गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सुपरस्टार रजनीकांत यांनी नदीगर संगमातील १००० कलाकारांना किराणा सामान देण्याचा विचार केला आहे. रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते शेवटचे दरबार चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.

टॅग्स :रजनीकांतकोरोना वायरस बातम्या