Join us  

लव्ह इन कोरोना टाइम्स...! 100 वर्षीय भारतीय फिल्ममेकरने उरकले गर्लफ्रेन्डसोबत लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 11:25 AM

याला 'प्रेम' म्हणतात...!

ठळक मुद्देयावर आणि नूर जहीर हे गत 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.

जीवघेणा कोरोना व्हायरस चीनमधून संपूर्ण जगभर पसरला़ एकट्या भारतात या व्हायरसने 300 वर लोकांना ग्रासले आहे. अख्ख्या जगात थैमान घालणा-या या व्हायरसमुळे सर्वत्र भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. पण इतक्या धडकी भरवणा-या वातावरणातही एका भारतीय फिल्ममेकरचे प्रेम बहरतेय. या 100 वर्षीय भारतीय फिल्ममेकरले नुकतेच आपल्या 70 वर्षीय गर्लफ्रेन्डसोबत लग्न केले. सध्या हे लग्न चांगलेच चर्चेत आहे.यावर अब्बास असे फिल्ममेकरचे नाव.  यावर अब्बास यांनी नुकतेच गर्लफ्रेन्ड नूर जहीरसोबत लंडनमध्ये लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे, कोरोनाचा धोका बघता लग्नानंतर लगेच हे जोडपे आयसोलेशनमध्ये गेले.

यावर व नूर दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.  खरे तर या लग्नाचा मुहूर्त आत्ताचा नव्हताच. 10 दिवसांनंतर हे लग्न होणार होते. म्हणजेच येत्या 27 मार्चला या लग्नाचा बार उडणार होता. पण कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती बघता या जोडप्याने घाईघाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला.होय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे महिनाभर चालणा-या सेल्फ आयसोलेशन पीरियडमध्ये लग्नाची नोंदणी होऊ शकणार नाही,असे रजिस्ट्रेशन ऑफिसकडून या जोडप्याला सांगण्यात आले. त्यामुळे यावर अब्बास व नूर यांनी गत 17 तारखेलाच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

यावर अब्बास यांनी उत्तर प्रदेशात फोटोग्राफर करिअरची सुरुवात केली होती. दुस-या महायुद्धादरम्यान यावर ब्रिटीश आर्मीत फोटोग्राफर होते. नंतर ते फिल्ममेकर बनले. त्यांची पत्नी नूर जहीर या एक सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. यावर आणि नूर जहीर हे गत 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. नूर जहीर या लेखक सज्जाद आणि रजिया यांची मुलगी. नादिरा बब्बर ही नूर यांची बहीण. नादिरा यांनी अभिनेते व नेते राज बब्बरसोबत लग्न केलेय.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या